AusvsInd : वर्षाचा शेवट गोड होणार? रहाणेच्या भात्यातून निघले पहिले शतक!

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 27 December 2020

नाणेफेक गमावल्यानंतर आक्रमक नेतृत्व शैली दाखवणाऱ्या अजिंक्य रहाणेनं फलंदाजीमध्ये संयमी खेळ करत रहाणे संघाचा डाव सावरला. कमिन्सच्या षटकात चौकार खेचर रहाणेनं शतकाला गवसणी घातली.

Ajinkya Rahane Hit Test Century : विराटच्या नेतृत्वाखाली पिंक बॉलवर सपाटून मार खाल्यानंतर टीम इंडियाचे काय होणार? असा मोठा प्रश्न क्रिकेट प्रेमींना पडला होता. अजिंक्य रहाणे नेतृत्वाचे ओझे पलून संघाला तारणार का? हा ही प्रश्न अनेकांना पडला असेल. मै हू ना!... म्हणत अजिंक्य रहाणेनं भारतीय संघाला फ्रंटफूटवर आणले. एवढेच नाही तर यंदाच्या वर्षातील पहिले शतकही अजिंक्य रहाणेच्या बॅटमधूनच निघाले. या वर्षात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यापूर्वी न्यूझीलंडचा दौरा केला होता. या दौऱ्यात कोणालाही शतकी खेळी करता आली नाही. भारतीय संघावर 2 सामन्यांच्या मालिकेत पराभवाची नामुष्कीही ओढावली होती. 

भारतीय संघाचा नियमित कर्णधार पहिल्या कसोटी सामन्यानंतर पॅटर्निटी लिव्हवर गेला. पहिल्या सामन्यात त्याच्या भात्यातून शतकी खेळीच आस तमाम क्रिकेट चाहत्यांना होती. पण त्याला शतक झाले नाही. विराटच्या शतकाशिवाय संपलेलं 2020 हे पहिलं वर्ष ठरलं. वर्षाअखेरच्या कसोटी सामन्यात मोठे आव्हान उभे असताना शतकी खेळी करेपर्यंत थांबण्याचे धैर्य कोण दाखवेल, याच उत्तर अजिंक्य रहाणेनं दिलं आहे. नाणेफेक गमावल्यानंतर आक्रमक नेतृत्व शैली दाखवणाऱ्या अजिंक्य रहाणेनं फलंदाजीमध्ये संयमी खेळ करत रहाणे संघाचा डाव सावरला. कमिन्सच्या षटकात चौकार खेचर रहाणेनं शतकाला गवसणी घातली.


​ ​

संबंधित बातम्या