AusvsInd 4th Test : आणखी एक दुखापत! टीम इंडियाच्या गोलंदाजानं सोडलं मैदान

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Friday, 15 January 2021

भारतीय संघाच्या गोलंदाजीची मदारही मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, टी नटराजन, शार्दुल ठाकूर आणि वाशिंग्टन सुंदरवर असेल. 

Navdeep Saini injury News:   भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना ब्रिस्बेनच्या मैदानात सुरु आहे. दुखापतग्रस्त टीम इंडिया मोठ्या बदलासह मैदानात उतरली आहे. सिडनी कसोटीतील हिरो अश्विनही संघात नाही. त्याच्या जागी वाशिंग्टन सुंदरला संधी देण्यात आली आहे. टी नटराजननेही कसोटी पदार्पण केले. भारतीय संघाच्या गोलंदाजीची मदारही मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, टी नटराजन, शार्दुल ठाकूर आणि वाशिंग्टन सुंदरवर असेल. 

ऑस्ट्रेलियाच्या डावातील 36 व्या षटकात भारताला एक सौम्य धक्का बसलाय. नवदीप सैनीला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले आहे. 7.5 षटकात सैनीने 21 धावा दिल्या. त्याला विकेट मिळाली नसली तरी त्याने कांगारुंवर दबाव निर्माण करणारी गोलंदाजी केली. पण दुखापतीमुळे तो मैदानाबाहेर गेल्याने टिम इंडियाचं टेन्शन निश्चित वाढले असेल. तो लवकर परत यावा, अशीच संघाची इच्छा असेल. त्याने मैदान सोडल्यानंतर रोहित शर्माने त्याचे षटक पूर्ण केले. 


​ ​

संबंधित बातम्या