पंतने संधी गमावली अन् पदार्पण करणाऱ्या पुकोवस्कीनं त्याच सोनं केलं (VIDEO)

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Thursday, 7 January 2021

दरम्यान पुकोवस्कीला बाद करण्याच्या दोन संधी देखील मिळाल्या. पण विकेटमागे पंतला त्या संधीच सोन करता आले नाही.

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात पावसानेही बॅटिंग केली. पावसामुळे खेळ थांबवण्यात आला त्यापूर्वीच ऑस्ट्रेलियन संघाने डेविड वॉर्नरच्या रुपात मोठे यश मिळवले. पण   7.1 षटकानंतर पुन्हा खेळ सुरु झाल्यानंतर कसोटी पदार्पण करणाऱ्या विल पुलोवस्की आणि लाबुशेनने संयमी खेळी करत आरामात धावा काढून ऑस्ट्रेलियन संघाचा डाव सावरला. या जोडीनं अर्धशतकी भागीदारी करुन पहिल्या दोन कसोटीच्या तुलनेत सिडनीचे मैदानात फलंदाजांसाठी आरामदायी खेळ करण्याची संधी देणार आहे, असे संकेत दिले. 

दरम्यान पुकोवस्कीला बाद करण्याच्या दोन संधी देखील मिळाल्या. पण विकेटमागे पंतला त्या संधीच सोन करता आले नाही, अश्विनच्या षटकात नकळत बॅटची कड घेऊन गेलेला झेल पंतकडून सुटला. 22 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर टीम इंडियाने विल पुकोवस्कीला बाद करण्याची संधी गमावली. त्यावेळी तो 26 धावा केल्या.  

 त्यानंतर 25 व्या षटकात सिराजच्या शॉर्ट बाउन्सरवरही पंतकडून गडबड झाली. पंचांनी पुकोवस्कीला बाद दिले. मात्र रिप्लायमध्ये थर्ड अंपायर्सनी झेल झाला नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे त्याला नाबाद ठरवण्यात आले. पंतला पहिल्या प्रयत्नात झेल पकडता आला नाही. दुसऱ्या प्रयत्नात चेंडू जमीनीला स्पर्श झाल्याचे रिप्ल्यायमध्ये दिसून आले.

दुसऱ्या सत्रात मिळालेल्या दोन संधीनंतर पदार्पणात विल पुकोवस्कीने अर्धशतकाला गवसणी घातली. तो आपली खेळी कुठपर्यंत घेऊन जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. पुकोवस्कीने लाबुशेनच्या साथीनं 87 धावांची भागीदारी केली. या जोडीच्या दमदार खेळीमुळे दुसरे सत्र ऑस्ट्रेलियाने आपल्या नावे केला. दोन झेलशिवाय रनआउट होता होता पुकोवस्की वाचला आङे. पदार्पणात शतकी खेळी करुन नवा विक्रम प्रस्थापित करण्यासाठी तो प्रयत्नशील असेल. 


​ ​

संबंधित बातम्या