AUSvsIND : स्टीव स्मिथची पाठ दुखावल्याने ऑस्ट्रेलियाच्या चिंतेत वाढ 

शैलेश नागवेकर
Tuesday, 15 December 2020

भारताविरुद्धचा पहिला कसोटी सामना काही तासांवर आलेला असताना ऑस्ट्रेलियाची चिंता वाढली आहे.

ऍडलेड : भारताविरुद्धचा पहिला कसोटी सामना काही तासांवर आलेला असताना ऑस्ट्रेलियाची चिंता वाढली आहे. हुकमी फलंदाज स्टीव स्मिथची पाठ दुखावली असून त्याने दहा मिनिटांतच सरावातून माघार घेतली. 

AUSvsIND : विराटसाठी रणनीती तयार : लॅंगर 

गुरुवारपासून सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी स्टीव स्मिथ ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाचा फलंदाज आहे. सरावास उतरल्यावर दहा मिनिटातच स्मिथ फिजिओसह ड्रेसिंग रूममध्ये परतला. आणि त्यानंतर तो पुन्हा सरावास आला नाही. उद्यापर्यंत तो सरावास येणार नाही, अशी माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्‍त्याने दिली. सरावात चेंडू अडवण्यासाठी खाली वाकल्यावर स्मिथची पाठ दुखावली, असेही या प्रवक्‍त्याने सांगितले. 

AUSvsIND: कोहलीने शतक केल्यास नावावर होऊ शकतो रिकी पॉन्टिंगचा रेकॉर्ड  

ऑस्ट्रेलिया संघाला अगोदरच दुखापतीने सतावलेले आहे. डेव्हिड वॉर्नर आणि त्याच्या ठिकाणी खेळू शकणारा विल पुकोवस्कीही दुखापतग्रस्त झाले आहेत. कॅमेरुन ग्रीनलाही दुखापत झाली होती. परंतु तो पहिल्या सामन्यात खेळेल असे प्रशिक्षक लॅंगर यांनी सांगितले. स्मिथ आणि वॉर्नर यांच्या अनुपस्थितीत गतवेळेस भारताने ऑस्ट्रेलियात प्रथमच मालिका जिंकली होती.


​ ​

संबंधित बातम्या