प्रेमाच्या डावाला ऑस्ट्रेलियन खेळाडू मॅक्सवेलची अशीही दाद  

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 November 2020

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील दुसरा वनडे सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडच्या मैदानात खेळवण्यात आला.

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील दुसरा वनडे सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडच्या मैदानात खेळवण्यात आला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी पुन्हा एकदा धावांची बरसात केली.  स्टीव्ह स्मिथने मालिकेतील सलग दुसरे शतक ठोकत संघाला मजबूत स्थितीत नेण्यात महत्त्वपूर्ण बजावली. स्मिथच्या बहरलेल्या खेळीने ऑस्ट्रेलियन संघाने दिलेले लक्ष्य भारतीय संघ पार करण्यात अपयशी ठरला. व त्यामुळे भारताला दुसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. मात्र हा सामना चालू असताना स्टेडियममध्ये प्रेम फुलल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.    

AUSvsIND : जाणून घ्या दुसऱ्या सामन्यातील टीम इंडियाच्या पराभवाची 5 कारणे

ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना सलग दुसऱ्या वेळेस साडेतीनशेहून अधिक धावसंख्या उभारली होती. भारतीय संघ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला होता. यावेळेस भारताच्या डावातील 20 व्या षटकात स्टेडियममध्ये प्रेम कहाणी फुलत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. एकाने चक्क भरलेल्या स्टेडियममध्ये तरुणीला प्रपोज केल्याचे पाहायला मिळाले. प्रपोज करणारा तरुण हा भारतीय जर्सी घालून होता. तर महिला ऑस्ट्रेलियन जर्सी घालून यजमान संघाचे समर्थन करताना दिसली. तरुणाने दिलेली अंगठी स्वीकारत तरुणीने भरल्या स्टेडियमवर प्रेमाला होकार दिला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ऑस्ट्रेलियाचा हुकमी एक्का जायबंदी; मैदान सोडून जावे लागले हॉस्पिटलात

शिवाय, प्रपोज करणाऱ्या तरुणाला अंगठी स्वीकारत तरुणीने भरल्या स्टेडियमवर प्रेमाला होकार दिल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलचे लक्ष याकडे गेले. व त्याने देखील मैदानावरून टाळ्या वाजवत या प्रेमी युगलांना शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले.        

क्रिकेटच्या मैदानात सामना पाहण्यासाठी आल्यानंतर असा प्रकार पाहायला मिळाल्याची ही पहिला घटना नाही. यापूर्वी देखील अनेकदा असे प्रकार पाहायला मिळाले आहेत. 2019 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील एका सामन्यात असाच प्रकार अनुभवायला मिळाला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे सामन्यांच्या मालिकेने भारताच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली आहे. याशिवाय कोरोनानंतर क्रिकेटची स्टेडियम प्रेक्षकांसाठी खुली होणारी ही पहिलीच मालिका आहे.


​ ​

संबंधित बातम्या