AUSvsIND : पराभवानंतर ऑस्ट्रेलिया मीडियाची सटकलीये? कोहली-पांड्यावर केला गंभीर आरोप 

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 3 January 2021

सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलिया कसोटीसाठी सज्ज असलेल्या पाच गड्यांवर आरोप झाल्यानंतर बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यासंदर्भात तपास सुरु केला असताना याचा सोक्षमोक्ष लागण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन मीडियाने मायदेशी परतलेल्या विराटला आणि हार्दिक पांड्याला या प्रकरणात ओढले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघातील पाच खेळाडूंनी कोरोना प्रोटोकॉलचं उल्लंघन करण्याचा दावा करणाऱ्या ऑस्ट्रेलिया मीडियाने आता आणखी एक वृत्त पसरवले आहे. पॅटर्निटी लिव्हवर मायदेशी परतलेल्या विराट कोहलीसह अष्टपैलू हार्दिक पांड्याने कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचे आरोप आता करण्यात येत आहे. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी भारतीय संघाचा उप-कर्णधार रोहित शर्मासह, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, नवदीप सैनी आणि ऋषभ पंत यांनी कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याचा दावा केला होता. बीसीसीआयने हे वृत्त फेटाळले होते. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियन मीडियाला विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने नियम मोडल्याची बातमी कळाली आहे. 

सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलिया कसोटीसाठी सज्ज असलेल्या पाच गड्यांवर आरोप झाल्यानंतर बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यासंदर्भात तपास सुरु केला असताना याचा सोक्षमोक्ष लागण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन मीडियाने मायदेशी परतलेल्या विराटला आणि हार्दिक पांड्याला या प्रकरणात ओढले आहे. भारतीय खेळाडूंनी कोरोना प्रोटोकॉल तोडण्याची ही पहिली वेळ नाही, असे सांगात ऑस्ट्रेलिया मीडियाने यापूर्वी विराट कोहली आणि हार्दिक पांड्या या टीम इंडियातील गड्यांनी कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याची आठवण करुन देण्याचा प्रयत्न केलाय.  

क्रीडा क्षेत्रातील आणखी बातम्यांसाठी सकाळच्या स्पोर्ट्स साईटला भेट द्या

ऑस्ट्रेलियनके ब्रॉडकास्टर्स फॉक्स क्रिकेटने यासंदर्भातील ट्विटरवरुन एक फोटो शेअर केलाय. विराट कोहली आणि हार्दिक पांड्याचा फोटो शेअर करुन भारतीय संघातील खेळाडूंनी यापूर्वीही नियमाचे उल्लंघन केले आहे, हे बिंबवण्याचा प्रयत्नच यातून सुरु असल्याचे दिसते. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पांड्यासोबत सिडनीच्या एका शॉपमध्ये गेले होते. त्यावेळी शॉपमधील महिला कर्मचाऱ्यासोबतच्या फोटो सेशन झाले होते, असा दावा या फोटोच्या माध्यमातू करण्यात आला आहे. हा फोटो सोशल मीडियावर त्यावेळीही चांगलाच व्हायरल झाला होता. 

 'द सिडनी मॉर्निंग हेराल्ड' आणि 'द एज' या ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमातून पाहुण्या संघातील खेळाडू प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचे म्हटले होते. विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांना मास्क घालून बाहेर पडायला हवे होते, अशा बातम्या स्थानिक वृत्तपत्रात छापून आल्या होत्या. पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा प्रसारमाध्यमाच्या आधारे माइंड गेम सुरु केला आहे, असेच म्हणावे लागेल. 


​ ​

संबंधित बातम्या