AUSvsIND Boxing Day Test : बॉक्सिंग डे च्या सामनावीराला मिळणार अनोखा बहुमान 

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Monday, 21 December 2020

ऑस्ट्रलिया सोबतच्या पहिल्या डे नाईट कसोटी सामन्यात भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर आता चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा बॉक्सिंग डे सामना येत्या शनिवार पासून मेलबर्नच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

ऑस्ट्रलिया सोबतच्या पहिल्या डे नाईट कसोटी सामन्यात भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर आता चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा बॉक्सिंग डे सामना येत्या शनिवार पासून मेलबर्नच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाचा संघ विजय मिळवून मालिकेत बढत मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. तर पहिल्या सामन्यात मिळालेल्या पराभवाचा बदला घेऊन भारतीय संघ मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताचा 8 विकेटने पराभव केला होता. 

मानहानीकारक पराभवानंतर आयपीएस अधिकाऱ्याकडून विराटची पाठराखण 

ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर खेळवण्यात येणार बॉक्सिंग डे सामना हा नेहमीच प्रत्येक संघासाठी खास असतो. आणि या सामन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला जॉनी मुलाग यांच्या सन्मानार्थ सामनावीर म्हणून पुरस्कार देण्यात येतो. जॉनी मुलाग हे परदेशी दौऱ्यावर जाणाऱ्या पहिल्या ऑस्ट्रेलियन संघाचे कर्णधार होते. जॉनी मुलाग यांच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाच्या संघाने 1868 मध्ये  इंग्लंडला भेट दिली होती. तसेच मुलाग हे ऑस्ट्रेलियाचे अष्टपैलू खेळाडू होते. त्यामुळे जॉनी मुलाग यांच्या सन्मानार्थ बॉक्सिंग डे कसोटीतील सर्वोत्कृष्ट खेळाडूला मुलाग पदक देण्यात येणार असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सोशल मीडियावरील ट्विटर हँडलवर सांगितले.        

हिटमॅनसोबत वर्ल्ड कप खेळलेल्या क्रिकेटरची बर्थडे दिवशी निवृत्ती  

ऑस्ट्रेलियाचे खेळाडू असलेल्या जॉनी मुलाग यांचे खरे नाव उनारिमिन होते. आणि 1868 मध्ये त्यांनी प्रादेशिक संघाचे नेतृत्व केले होते. शिवाय या दौऱ्यात त्यांनी 47 पैकी 45 सामने खेळत, 23 च्या सरासरीने 71 डावात मिळून 1698 धावा केल्या. याव्यतिरिक्त 1877 षटके देखील त्यांनी टाकली. आणि यातील 831 षटके जॉनी मुलाग यांनी मेडन टाकली होती. इतकेच नाही तर 10 च्या सरासरीने त्यांनी 257 बळी टिपले होते. व 1866 मध्ये मेलबर्न क्रिकेट मैदानात मुलाग यांनी बॉक्सिंग डे कसोटी सामनाही खेळला होता.  

दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्यानंतर भारतीय संघ पहिल्या डावात 244 धावांवर बाद झाला होता. तर ऑस्ट्रेलियाच्या संघाला पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत 191 धावांवर रोखले होते. मात्र दुसऱ्या डावात भारतीय संघ फक्त 36 धावांवर बाद झाला होता. त्यानंतर आता दुसरा कसोटी सामना 26 डिसेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. 


​ ​

संबंधित बातम्या