कोहलीला हटवा; टीम इंडियाच्या फ्लॉपशोनंतर हिटमॅनचा ट्रेंड

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Saturday, 19 December 2020

स्नायूला झालेल्या दुखापतीमुळे रोहित शर्माला वनडे आणि टी-20 संघात स्थान मिळाले नव्हते. मुळात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याला संघातच स्थान मिळाले नव्हते. पण आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून मैदानात उतरल्यानंतर त्याच्या निवडीमागे राजकारण सुरुय का? असा प्रश्न उपस्थितीत करण्यात आला.

Australia vs IndiaTest : ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर सोशल मीडियावर संघातील खेळाडू आणि कोहलीच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात येत आहे. भारतीय संघ दुसऱ्या डावात अवघ्या 36 धावांत आटोपला. भारतीय संघाच्या पराभवानंतर ट्विटरवर रोहित शर्माचा ट्रेंड पाहायला मिळाला. नेटकरी रोहित शर्माच्या मजेदार मिम्ससह कोहलीला ट्रोल करताना दिसले. 

स्नायूला झालेल्या दुखापतीमुळे रोहित शर्माला वनडे आणि टी-20 संघात स्थान मिळाले नव्हते. मुळात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याला संघातच स्थान मिळाले नव्हते. पण आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून मैदानात उतरल्यानंतर त्याच्या निवडीमागे राजकारण सुरुय का? असा प्रश्न उपस्थितीत करण्यात आला. अखेर बीसीसीआयने कसोटी मालिकेसाठी त्याला संघात स्थान दिले. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी युएईतून इतर खेळाडू ऑस्ट्रेलियाला रवाना झाले. पण रोहित शर्माला मायदेशी परतून बंगळुरुस्थित राष्ट्रीय अकादमीत फिटनेससाठी मेहनत घ्यावी लागली. फिट घोषित केल्यानंतर तो ऑस्ट्रेलियाला रवानाही झालाय. पण क्वारंटाईन नियमावलीमुळे त्याला पहिल्या दोन कसोटी सामन्याला मुकावे लागणार आहे.

 2 दिवसांच्या उत्तम खेळाला तासाभरात गालबोट लागलं; कोहली झाला निशब्द!

ट्विटरवर रोहित शर्माने दुसऱ्या सामन्यातच मैदानात उतरायला हवे, अशीही चर्चा रंगली आहे. एवढेच नाही तर कोहलीच्या जागी आता संघाचे नेतृत्वही रोहितकडे सोपवण्याची वेळ आली आहे, अशी मागणीही नेटकरी करताहेत. (कोरोनाच्या नियमावलीमुळे दुसऱ्या सामन्यात नेटकऱ्यांची इच्छा पूर्ण होऊ शकत नाही) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना 26 डिसेंबरपासून रंगणार आहे. चार सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियन संघ सध्या 1-0 असा आघाडीवर आहे.  
 


​ ​

संबंधित बातम्या