आफ्रिदी म्हणाला, टीम इंडियात कमबॅक करण्याची ताकद आहे, पण...

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Saturday, 19 December 2020

बिकट परिस्थिती ओढावलेल्या भारतीय संघाच्या क्षमतेवरही त्याने भाष्य केले. भारतीय संघात कमबॅक करण्याची ताकद आहे. पण विराट कोहलीशिवाय त्यांना पुनरागमन करणे खूप आव्हानात्मक असेल, असाही उल्लेख त्याने आपल्या ट्विटमध्ये केलाय.

IND vs AUS Border Gavaskar Trophy 2020 : भारतीय संघाच्या  (Indian Team) पिंक बॉल पराभवावर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. पाकिस्तानी जलदगती गोलंदाजाने ट्विटवरुन भारतीय संघाचा चिमटा काढल्यानंतर पाकचा माजी कर्णधार आणि क्रिकेटर शाहिद आफ्रिदीने भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीवर आपले मत व्यक्त केले आहे. हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांच्यामुळे खूप दिवसांनी भेदक मारा पाहायला मिळाल्याचे म्हटले आहे. सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी सर्वात बेस्ट आहे, असेही तो म्हणाला. 

बिकट परिस्थिती ओढावलेल्या भारतीय संघाच्या क्षमतेवरही त्याने भाष्य केले. भारतीय संघात कमबॅक करण्याची ताकद आहे. पण विराट कोहलीशिवाय त्यांना पुनरागमन करणे खूप आव्हानात्मक असेल, असाही उल्लेख त्याने आपल्या ट्विटमध्ये केलाय. पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पॅटर्निटी लिव्हवर मायदेशी परततोय. उर्वरित तीन सामन्यात भारतीय संघाला त्याच्याशिवाय मैदानात उतरायचे आहे. 

कोहलीला हटवा; टीम इंडियाच्या फ्लॉपशोनंतर हिटमॅनचा ट्रेंड

मानहानीकारक पराभवाच्या आठवणी बाजूला ठेवून भारतीय संघ मालिकेत कमबॅक करणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आफ्रिदीने भारतीय संघात क्षमता असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी शोएब अख्तरनं ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली होती. झोपेतून उठलो त्यावेळी जेव्हा भारतीय संघाचा स्कोअर बोर्ड पाहिला तेव्हा संघाच्या धावफलकावर 369 धावा असल्याचे वाटले. मात्र नीट पाहिल्यानंतर भारताने 36 धावांत 9 विकेट गमावल्याचे दिसले, असे ट्विट करत शोएब अख्तरने टीम इंडियाच्या कामगिरीची खिल्ली उडवली होती. 


​ ​

संबंधित बातम्या