ऑस्ट्रेलियात क्वारंटाईन झाल्यानंतरही रोहितच्या फिटनेस 'टेस्ट'चा सिलसिला सुरुच राहणार!

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Saturday, 12 December 2020

आयपीएलमध्ये खेळत असताना त्याला टीम इंडियात स्थान का नाही? असा प्रश्नही उपस्थितीत करण्यात आला. अखेर त्याला कसोटीसाठी संघात स्थान मिळाले. पण 100 टक्के फिट नसल्याचे कारण देत बीसीसीआयने रोहितला युएईतून ऑस्ट्रेलियात न नेता बंगळुरुस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत धाडले होते. 

India Tour Of Australia 2020 : बंगळुरु स्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीनं रोहित शर्माला फिट घोषीत करत त्याचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याचा मार्ग मोकळा केला आहे. क्वारंटाईनच्या नियमावलीमुळे रोहित शर्मा सुरुवातीच्या दोन कसोटी सामन्याला मुकणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्दच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत तो खेळण्यासंदर्भातही संभ्रमाचे वातावरण आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीनं रोहितला फिट केले असले तरी ऑस्ट्रेलियात त्याची आणखी एक फिटनेस टेस्ट होणार आहे. या टेस्टनंतरच तो उर्वरित दोन कसोटी सामन्यात खेळणार की नाही, यावर निर्णय घेण्यात येईल, असे बीसीसीआयने म्हटले आहे. रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाला नेमकं कधी निघणार याबाबत कोणतीही माहिती बीसीसीआयने दिलेली नाही.   

ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर कोरोना प्रोटोकॉलनुसार रोहित शर्माला 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. क्वारंटाईन कालावधीत हॉटेलमध्ये रोहित शर्माने कोणत्या प्रकारच्या व्यायामावर भर द्यावा. फिटनेस टेस्टची कशी तयारी करावी, यासंदर्भात वेळापत्रक तयार करण्यात येणार असून टेस्टचा सिलसिला क्वारंटाईनमध्येही कायम राहणार असल्याचे दिसते.  क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण करताच रोहितला मेडिकल टीमच्या टेस्टला सामोरे जावे लागेल. मेडिकल टीमने फिट घोषित केले तरच तो 7 जानेवारीपासून रंगणाऱ्या कसोटीसाठी मैदानात उतरेल. 

हिटमॅन फिट है! टेस्ट पास झालेला रोहित प्लाइट कधी पकडणार? 

युएईत रंगलेल्या आयपीएल स्पर्धेतील एका सामन्यात मांडीचा स्नायूला झालेल्या दुखापतीमुळे त्याला या स्पर्धेतील काही सामन्यांना मुकावे लागले होते. ऑस्ट्रेलिया दौरा तोंडावर असताना त्याने आयपीएलमध्ये खेळू नये, असा सल्ला भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी त्याला दिला होता. याकडे लक्ष्य न देता रोहित शर्मा साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यासह फायनलपर्यंतच्या सर्व सामन्यात मैदानात उतरला. मुंबई इंडियन्सकडून फायनलमध्ये त्याने संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटाही उचलला.

आयपीएलमध्ये खेळत असताना त्याला टीम इंडियात स्थान का नाही? असा प्रश्नही उपस्थितीत करण्यात आला. अखेर त्याला कसोटीसाठी संघात स्थान मिळाले. पण 100 टक्के फिट नसल्याचे कारण देत बीसीसीआयने रोहितला युएईतून ऑस्ट्रेलियात न नेता बंगळुरुस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत धाडले होते. 


​ ​

संबंधित बातम्या