AUSvsIND : बापरे! कांगारुंच्या स्विंगसमोर तग धरणारा किंग कोण ठरणार?

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Thursday, 17 December 2020

मयांक अगरवालने 40 चेंडूंचा सामना करताना 2 चौकाराच्या मदतीने 17 धावा केल्या. सतरा आणि खतरा अशी काहीशी अवस्था त्याची पॅट कमिन्सचा चेंडू खेळल्यानंतर झाली.

India Tour Of Australia Border Gavaskar Trophy 2020:   ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय कर्णधाराने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा खेळण्याचा निर्णय घेतला खरा. पण गुलाबी चेंडूवर आघाडीच्या फलंदाजांची अक्षरश: भंबेरी उडाल्याचे दिसले. लंचपूर्वीचं टीम इंडियाचे आघाडीचे दोन गडी तंबूत परतले. पिंक बॉल स्पेशलिस्ट मिशेल स्टार्क आणि पॅट कमिन्स या दोघांनी भारताच्या आघाडीला सुरुंग लावला.

पहिल्या षटकात पृथ्वी शॉ आल्या पावली परतल्यानंतर पुजाराच्या साथीनं मयांकने मैदानात तग धरण्याचा प्रयत्न केला. तो कांगारु गालंदाजांचा जोश कमी करण्याच्या दिशेने आपली इनिंग बिल्ड करत असताना कमिन्सने त्याचे मनसुबे उधळून लावले.

पृथ्वीचा फ्लॉप शो; टीम इंडियाला गोत्यात आणणारा 

मयांक अगरवालने 40 चेंडूंचा सामना करताना 2 चौकाराच्या मदतीने 17 धावा केल्या. सतरा आणि खतरा अशी काहीशी अवस्था त्याची पॅट कमिन्सचा चेंडू खेळल्यानंतर झाली. चेंडू ज्यापद्धतीने काटा बदल यष्टीचा वेध घेतला ते पाहून मैदानात तग धरुन भारतीय संघाला तारणार कोण? असा प्रश्न मॅच पाहणाऱ्या क्रिकेट चाहत्यांना निश्चितच पडला असेल. दोन्ही सलामीवीरांचा उडलेला त्रिफळा ऑस्ट्रेलियन गोलंदाजातील ताकदीचा उत्तम नमुनाच होता. 

सलामीवीर स्वस्तात माघारी परतल्यानंतर गुलाबी चेंडूवरील खेळात संघाचा रुबाब दाखवून देण्याची जबाबदारी आता कसोटी स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजारा आणि रन मशिन विराट कोहली यांच्या खांद्यावर आहे. अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारीवर देखील भारतीय संघाची बॅटिंग ऑर्डर अवलंबून आहेत. पण ही दोघ मैदानात उतरण्यापूर्वी विराट-पुजाराला डावाला आकार देण्याचे चॅलेंज आहे. ऑस्ट्रेलियाच्या माऱ्यासमोर ही जोडी किती काळ तग धरणार यावर सर्व गणिते अवलंबून असतील.


​ ​

संबंधित बातम्या