AUSvsIND चर्चा सिराजच्या खिलाडूवृत्तीची! व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 13 December 2020

नॉन स्ट्राइकला असलेल्या मोहम्मद सिराजने हातातील बॅट टाकून दुखापतग्रस्त झालेल्या प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजाकडे धाव घेतली.

India Tour Of Australia 2020 : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या युवा क्रिकेटर मोहम्मद सिराज सध्या चांगलाच चर्चेत आहे. भारत  आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील सराव सामन्यातील त्याने दाखवलेल्या खिलाडूवृत्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतो. ऑस्ट्रेलियन संघातील गोलंदाज कॅमरुन ग्रीनने टाकलेल्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने थेट गोलंदाजाच्या दिशने टोलवला. जोरदार मारलेला हा फटका कॅमरुन ग्रीनच्या डोक्यावर जाऊन आदळला. 

यावेळी नॉन स्ट्राइकला असलेल्या मोहम्मद सिराजने हातातील बॅट टाकून दुखापतग्रस्त झालेल्या प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजाकडे धाव घेतली. त्याची विचारपूस करत दुखापत गंभीर नसल्याची खात्री त्याने करुन घेतल्याचे पाहायला मिळाले. बुमराहने मारलेला चेंडू ग्रीनने अडवण्याचा प्रयत्न केला. पण तो त्याच्या डाव्या हाताला लागून डोक्यावर आदळला. या घटनेनंतर ग्रीनला  Concussion नियमानुसार बाहेर जावे लागले. 

AUS A vs IND : बुमराहचा धमाका; कांगारुंचे खांदे पाडत झळकावली फिफ्टी!

भारत आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील दुसरा सराव सामनाही अनिर्णित राहिला. या सामन्यात जसप्रित बुमराहच्या भात्यातून अर्धशतकी खेळी निघल्याचे पाहायला मिळाले. बुमराहच्या खेळीनंतर सोशल मीडियावर सिराजच्या खिलाडूवृत्तीची चर्चा चांगलीच रंगली. या सामन्यातील पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने अर्धशतक झळकावले. तर दुसऱ्या डावात हनुमा विहारीनं नाबाद शतकी खेळीसह पंतच्या भात्यातूनही शतक पाहायला मिळाले होते. सिराजने दोन्ही डावात मिळून 2 विकेट घेतल्या होत्या.


​ ​

संबंधित बातम्या