AUSvsIND थट्टामस्करी चालेल, शिवीगाळ नकोच

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 November 2020

थट्टामस्करी चालू शकेल, स्पर्धात्मक लढाऊ वृत्ती ठेवण्यासाठी एकमेकांची खिल्ली उडवलेली चालेल. मात्र शिवीगाळ करणे सहन करणार नाही, असे लॅंगर यांनी सांगितले.

सिडनी : भारताविरुद्धच्या मालिकेत शिवीगाळ करण्यास थारा नसेल, असे ऑस्ट्रेलियाचे मार्गदर्शक जस्टीन लॅंगर यांनी स्पष्ट केले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका यापूर्वी प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या शेरेबाजीने तसेच एकमेकांना उद्देशून अपशब्द वापरल्याने गाजत असे. 

भारतीय संघ आपणास लक्ष्य करेल, असे डेव्हिड वॉर्नरने गेल्या आठवड्यात सांगितले होते. पण लॅंगर यांनी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मर्यादा ओलांडणार नाहीत असे सांगितले. थट्टामस्करी चालू शकेल, स्पर्धात्मक लढाऊ वृत्ती ठेवण्यासाठी एकमेकांची खिल्ली उडवलेली चालेल. मात्र शिवीगाळ करणे सहन करणार नाही, असे लॅंगर यांनी सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या