ऑस्ट्रेलियाला दुखापतीची साडेसाती कायम; आता वेगवान गोलंदाज सिन ऍबॉट जखमी

शैलेश नागवेकर
Monday, 14 December 2020

हेन्रिक्‍सही दुखापतग्रस्त खेळाडूंच्या यादीत होता. हेन्रिक्‍सला हॅमस्ट्रिंगची हलकी दुखापत झाली होती, त्यामुळे सिडनीवर झालेल्या सराव सामन्यात तो खेळला नव्हता.

Australia vs India Border Gavaskar Trophy 2020  : भारताविरुद्धची बहुचर्चित कसोटी मालिका सुरू होण्यापर्यंत ऑस्ट्रेलिया संघाचा एकेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर जात आहे. आता वेगवान गोलंदाज सिन ऍबॉट जखमी झाला असून त्याच्याऐवजी अष्टपैलू सिन ऍबॉटची निवड करण्यात आली आहे. भारताविरुद्धच्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलिया "अ' संघातून ऍबॉट खेळला होता. या सामन्यात त्याच्या पोटरीचा स्नायू दुखावला. त्यामुळे तो प्रकाशझोतातील पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. दुसऱ्या सामन्यापर्यंत तो तंदुरुस्त होण्याची शक्‍यता आहे. 

याच सराव सामन्यात गोलंदाजी करत असताना बुमराने मारलेला चेंडू डोक्‍याला लागलेला अष्टपैलू कॅमेरुन ग्रीन कन्कशनच्या दुखापतीतून हळूहळू सावरत आहे. भारतीय संघाला सिडनीतून दक्षिण ऑस्ट्रेलियात घेऊन गेलेल्या खास विमानातूनच आता कॅमेरुन ग्रीन, हेन्रिक्‍स आणि मिशेल स्टार्क पर्थचा प्रवास करणार आहेत. जैव सुरक्षेच्या चौकटीमुळे खेळाडू खास विमानातूनच एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करत आहेत. 

AUS vs IND स्टार्कचा गुलाबी चेंडूवरील प्रभाव आणि जोश हेझलवूडचे आव्हान

हेन्रिक्‍सही दुखापतग्रस्त खेळाडूंच्या यादीत होता. हेन्रिक्‍सला हॅमस्ट्रिंगची हलकी दुखापत झाली होती, त्यामुळे सिडनीवर झालेल्या सराव सामन्यात तो खेळला नव्हता. सोमवारी झालेल्या तंदुरुस्त चाचणीत तो पास झाला. 2016 नंतर त्याला कसोटी संघात पुनरागमन करण्याची संधी मिळाली आहे. भारताविरुद्ध नुकत्याच झालेल्या एकदिवसीय आणि ट्‌वेन्टी-20 मालिकेत तो खेळला होता. 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासंदर्भातील सर्व अपडेट्स एका क्लिकवर 

डेव्हिड वॉर्नर दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेला असल्यामुळे विल पुकोवस्कीला संधी मिळणार होती, परंतु सराव सामन्यात त्याच्या डोक्‍याला मार लागला आणि तोही संघाबाहेर गेला, त्यामुळे मार्कस हॅरिसची संघात निवड करण्यात आलेली आहे. 
असा आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ :  टिम पेन (कर्णधार), पॅट कमिंस, कॅमेरुन ग्रीन, मार्कस हॅरिस, जॉश हॅझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मोसेस हेन्रिक्‍स, मार्नस लबुशेन, नॅथन लायन, मिशेल नेसर, जेम्स पॅटिन्सन, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क, मिशेल स्वेपसन आणि मॅथ्यू वेड.
 


​ ​

संबंधित बातम्या