Playing XI for Gabba, Brisbane 4th Test : 1996 नंतर पहिल्यांदाच असे घडले; पाहा कसा आहे संघ
सिडनीच्या मैदानात ऐतिहासिक कामगिरी नोंदवत भारतीय संघाने सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले आणि मालिकेतील 1-1 बरोबरी कायम राहिली.
Australia vs India Gabba Brisbane Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर टॉफीसाठीचा अखेरचा सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानात खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांसमोर दुखापतीतून सावरून मालिका जिंकण्याचे मोठे आव्हान असेल. या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातील विजयासह टीम इंडियाने मालिकेत बरोबरी राखली. सिडनीच्या मैदानात ऐतिहासिक कामगिरी नोंदवत भारतीय संघाने सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले आणि मालिकेतील 1-1 बरोबरी कायम राहिली.
दुखापतीमुळे अष्टपैलू हनुमा विहारी, रविंद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांनी चौथ्या कसोटीतून माघार घेतली. यांच्या जागेवर कोणला संधी मिळणार? रहाणेच्या नेतृत्वाखाली टी नटराजनच्या रुपात आणखी एक युवा चेहरा कसोटीमध्ये पदार्पण करणार का? असे अनेक प्रश्न पडले होते. भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर याचे उत्तर मिळाले आहे. मागील तीन सामन्यात सामन्याच्या आदल्या दिवशी संघ घोषीत करणाऱ्या टीम इंडियाने चौथ्या आणि अखेरच्या सामन्यात नाणेफेकीनंतर संघ जाहिर केला.
सिडनी कसोटीत दमदार खेळी करणाऱ्या अश्विनशिवाय टीम इंडिया मैदानात उतरली आहे. मयांक अग्रवालला पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर वाशिंग्टन सुंदर आणि टी नटराजन या दोघांनी ब्रिस्बेन कसोटीतून पदार्पण केले आहे. यापूर्वी मोहम्मद सिरज, नवदीप सैनी आणि शुभमन गिल यांना संघात स्थान मिळाले होते. इंग्लंड दौऱ्यावर 1996 मध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक खेळाडूंनी पदार्पन केले होते. या वर्षी सुनील जोशी, फारस म्हांब्रे, व्यंकटेश प्रसाद, विक्रम राठोर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांनी पदार्पण केले होते.
India (Playing XI): रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (कर्णधार), मयांक अग्रवाल, ऋषभ पंत, (यष्टिरक्षक), वाशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी मोहम्मद सिराज, टी नटराजन.