AUS vs IND : कांगारुंना दुखापतीचं ग्रहण, वॉर्नरनंतर फिंचही बाहेर पडणार?

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Saturday, 5 December 2020

कॅनबेरा येथील पहिल्या टी20 सामन्यात क्षेत्ररक्षणावेळी फिंचला दुखापत झाली होती. या दुखापतीतून तो सावरला नसून दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी तो मैदानात उतरण्याची शक्यता धूसरच आहे. दुसरीकडे उर्वरित दोन टी-20 सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाने नॅथन लायनला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले आहे.

Australia vs India, 2nd T20I पहिल्या टी-20 सामन्यातील पराभवानंतर ऑस्ट्रेलियन संघाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. टी-20 मालिका वाचवण्यासाठी त्यांना कर्णधार फिंचशिवाय मैदानात उतरण्याची वेळ येणार असल्याची चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात रंगत आहे.  सिडनीच्या मैदानात रंगणाऱ्या सामन्यापूर्वी एरॉन फिंचला (Aaron Finch) दुखाप झाल्याचे वृत्त समोर येत आहे.

कॅनबेरा येथील पहिल्या टी20 सामन्यात क्षेत्ररक्षणावेळी फिंचला दुखापत झाली होती. या दुखापतीतून तो सावरला नसून दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी तो मैदानात उतरण्याची शक्यता धूसरच आहे. दुसरीकडे उर्वरित दोन टी-20 सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाने नॅथन लायनला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले आहे.

 भर मैदानात प्रपोज करणाऱ्या 'दीपेन'ने सांगितली लव्ह स्टोरी 

प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, वॉर्नला जी दुखापत झाली आहे त्याच प्रकारच्या दुखापतीनं फिंचही त्रस्त आहे. क्षेत्ररक्षणावेळी झालेल्या दुखापतीनंतरही त्याने ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरुवात केली होती. बॅटिंग करताना त्याला वेदना होत असल्याचेही दिसून आले होते. सामन्यानंतर त्याने स्वत: आपण फिट नसल्याची माहिती दिली होती. जर फिंच दुसऱ्या मॅचला मुकला तर मॅथ्यू हेड ऑस्ट्रेलियन संघाच्या नेतृत्वाची धूरा सांभाळताना दिसेल.  

AUSvsIND T20 : लक्षणीय कामगिरी करत रवींद्र जडेजाने मोडला धोनीचा रेकॉर्ड  

ऑस्ट्रेलियन संघाला दुखापतीच ग्रहण 

ऑस्ट्रेलियन संघातील दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी मोठी होताना दिसत आहे. वनडे मालिकेदरम्यान डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस स्टोयनिस यांना दुखापत झाली होती. फिरकीपटू एस्टन एगर देखील दुखापतीमुळे टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. मिचेल स्टार्कही अखेरच्या वनडेला मुकला होता. वनडे मालिकेतील पराभवानंतर टीम इंडियाने टी-20 दमदार कमबॅक केले असून दुसरा सामना जिंकून मालिका विजयाच्या इराद्याने संघ मैदानात उतरेल. टी-20 मालिका जिंकून भारतीय संघ वनडेतील पराभवाचा वचपा काढणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 


​ ​

संबंधित बातम्या