Aus vs Ind 4th Test Record : नटराजन-वॉशिंग्टनने जिंकलं; 71 वर्षांनंतर जुळून आला कमालीचा योगायोग

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Saturday, 16 January 2021

या सामन्यात पदार्पण करणाऱ्या टी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी चांगलेच प्रभावित केले.

Australia vs India 4th Test Record : ब्रिस्बेनच्या मैदानात सुरु असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 369 धावांवर आटोपला. या सामन्यात पदार्पण करणाऱ्या टी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी चांगलेच प्रभावित केले. दोघांनी पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या तीन-तीन गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला. त्यांच्याशिवाय शार्दुल ठाकूरनेही 3 विकेट घेतल्या.  

5 बाद 274 धावांवरुन ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. अवघ्या 95 धावांत भारतीय गोलंदाजांनी कांगारुंचा अर्धा संघ आटोपला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात 71 वर्षानंतर कसोटी सामन्यात पदार्पण करणाऱ्या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्याचे पाहायला मिळाले.  

1949 नंतर पहिल्यांदा जुळून आला योगायोग 

1949 मध्ये भारतीय संघातील दोन गोलंदाजांनी पदार्पणाच्या कसोटी सामन्यातील सामन्यात 3-3 विकेट घेतल्या होत्या. कोलकाता मध्ये रंगलेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात मंटू बनर्जी आणि गुलाम अहमद यांनी असा पराक्रम केला होता. 2021 मध्ये जवळपास 71 वर्षानंतर  टी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी अशीच कमाल करुन दाखवली. क्रिकेटच्या मैदानातील हा कमालीचा योगायोगच मानावा लागेल. नटराजनने 24.3 षटकात 78 धावा खर्च करुन 3 विकेट घेतल्या. दुसरीकडे फिरकीपटू सुंदरने 31 षटकात 89 धावा खर्च करत तिघांना आपल्या जाळ्यात अडकवले.  

SLvsENG : लंकेत जो रुटचा 'जलवा'; द्विशतकासह आशियात साकारली सर्वात मोठी खेळी

नेटमधून थेट संघात वर्णी

भारतीय संघात कसोटी पदार्पण करणाऱ्या नटराजन आणि सुंदर यांना सुरुवातीला कसोटी संघात स्थान मिळाले नव्हते. टी-20 मध्ये स्थान मिळालेल्या यो दोन्ही गोलंदाजांना नेट प्रॅक्टिसवेळी गोलंदाजी करण्यासाठी संघासोबत थांबवण्यात आले होते. उमेश यादव जागा भरुन काढण्यासाठी टी नटराजनला संधी मिळाली. तर अश्विनच्या पाठदुखीमुळे वॉशिंग्टनला संघात स्थान देण्यात आले.  


​ ​

संबंधित बातम्या