अम्पायर तर सोडाच, पंतची अपील अजिंक्य-रोहितनंच फेटाळली (VIDEO)

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Friday, 15 January 2021

ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबूत परतल्यानंतर कर्णधार टिम पेन-कॅमरुन ग्रीन डाव सावरण्याचा प्रयत्न करत होते. दिवसाअखेरची काही षटके बाकी असताना नटराजनच्या षटकातील तिसरा चेंडू पेनला कळला नाही. आणि पंत अपील का करतोय हे अजिंक्य-रोहितला कळलं नाही.

australia vs india 4th test : ब्रिस्बेनमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना रंगला आहे. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 5 बाद 274 धावा केल्या. पहिल्या दिवशी विकेटमागे रिव्हूसाठी धडपडणाऱ्या पंतची कर्णधार-उपकर्णधारानेच अपील फेटाळल्याचे पाहायला मिळाले.   ऑस्ट्रेलियाच्या डावातील 84 व्या षटकात नटराजन गोलंदाजी करत होता. त्याने टाकलेला चेंडू टिम पेनला समजला नाही. चेंडू ग्लोव्ह्जमध्ये येताच पंतने विकेट मागे आउट असल्याचा बाउ केला. पण तो स्लीपमध्ये उभ्या असलेल्या कर्णधार अजिंक्य रहाणे आणि उप-कर्णधार रोहितने त्याला काहीच दाद दिली नाही. पंत एकटाच अपील करताना दिसले.  
 
पंतने स्विंग झालेल्या चेंडूवर केली अपील 

ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबूत परतल्यानंतर कर्णधार टिम पेन-कॅमरुन ग्रीन डाव सावरण्याचा प्रयत्न करत होते. दिवसाअखेरची काही षटके बाकी असताना नटराजनच्या षटकातील तिसरा चेंडू पेनला कळला नाही. बॅटचा आणि बॉलचा काहीही संबंध नसताना स्विंगनं चकवा दिलेल्या चेंडूवर पंत रिव्ह्यू घ्यायला तयार झाला. पण कर्णधाराने त्याला कोणतीही दाद दिली नाही.  

रहाणे आणि रोहितने घेतली पंतची शाळा

रहाणेनं पंतच्या अपीलकडे दुर्लक्ष केले. रोहितचा अंदाजही काही औरच दिसला. दोघांनी पंतची चांगलीच खिचाई केली. रिप्लायमध्ये बॅट-बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट झाला नसल्याचे स्पष्ट दिसत होते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनीही पंतला चांगलेच ट्रोल केल्याचे दिसते. स्मिथ असता तर त्याला चिटर म्हटले असते, असे एका नेटकऱ्यांनी म्हटले आहे. दुसऱ्या एका युजर्सने पंत विनोद करतोय असा टोला लावला आहे. 


​ ​

संबंधित बातम्या