Australia vs India 4th Test Day 4 : भारत बिन बाद 4 धावा; विजयासाठी 324 धावांची गरज

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Monday, 18 January 2021

अर्धशतकानंतर एका अप्रतिम बाउन्सरवर सिराजने स्मिथला धाडले तंबूत

Australia vs India 4th Test Day 4 :  ब्रिस्बेनच्या मैदानात सुरु असलेल्या चौथ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात पावसाचा वारंवार व्यत्यय आला. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 294 धावांत आटोपला. पहिल्या डावातील 33 धावांसह ऑस्ट्रेलियाने टीम इंडियासमोर 328 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. चौथ्या दिवसाअखेर पावसामुळे खेळ थांबवण्यात आला तेव्हा भारतीय संघाने बिन बाद 4 धावा केल्या होत्या. रोहित शर्माने एका चौकाराच्या मदतीने खाते उघडले होते. तर शुभमन खाते उघडण्याच्या प्रतिक्षेत आहे.   

ब्रिस्बेन कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी 54 धावांच्या आघाडीसह डेविड वॉर्नर आणि मार्कस हॅरिस जोडीने चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत आणले. ही जोडी धोकादायक ठरत असताना शार्दुल ठाकूरने मार्कस हॅरिसला 38 धावांवर पंतकरवी झेलबाद केले.

अर्धशतकाच्या उंबरठ्यावरच डेविड वॉर्नरही वॉशिंग्टनच्या जाळ्यात अडकला. त्याने 75 चेंडूत 6 चौकाराच्या मदतीने 48 धावा केल्या. मार्नस लाबुशेन 25 (22) धावा करुन तंबूत परतला. सिराजने त्याला माघारी धाडले. मॅथ्यू वेडला सिराजने खातेही उघडू दिले नाही. 
आघाडीचे चार गडी माघारी परतल्यानंतर स्टिव्ह स्मिथ आणि कॅमरुन ग्रीन जोडीनं संघाचा डाव सावरला आहे. स्टिव्ह स्मिथने कारकिर्दीतील 31 वे अर्धशतक पूर्ण केले. यासाठी त्याने 67 चेंडू खेळले. 42 धावांवर सिराजने त्याचा सोडलेला झेल सोडला होता. त्यानेच अर्धशतकानंतर एका अप्रतिम बाउन्सरवर स्मिथला माघारी धाडले.

ये हिटमॅन का स्टाईल है; रोहितने स्मिथच्या खोडीची केली परतफेड; व्हिडिओ होतोय व्हायरल

स्मिथ बाद झाल्यानंतर संघाचा डाव सावरणाऱ्या कॅमरुन ग्रीनला शार्दुलने स्लीमध्ये झेलबाद केले . त्याने 90 चेंडूंचा सामना करुन 3 चौकाराच्या मदतीने 37 धावा केल्या. 6 बाद 227 धावांवरुन पेन टिम आणि पॅट कमिन्स यांनी डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. शार्दुलने कॅप्टन पेनला पंतकरवी झेलबाद केले. त्याने 37 चेंडूत 3 चौकाराच्या मदतीने 27 धावा केल्या. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ काही काळ थांबवण्यात आला. त्यानंतर  खेळाला सुरुवात झाल्यानंतर सिराजने मिचेल स्टार्कच्या रुपात ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का दिला. नॅथन लायनची विकेट घेत शार्दुल ठाकूरने कांगारुंना नववा धक्का दिला. सिराजने हेडलवूडला बाद करत ऑस्ट्रेलियाला दुसरा डाव  294 धावांत आटोपला. भारताकडून सिराजने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. शार्दुल ठाकूरला 4 तर वॉशिंग्टन सुंदरला एक विकेट मिळाली.  


​ ​

संबंधित बातम्या