Aus vs Ind 4th Test Day 2: पावसाच्या बॅटिंगमुळं, भारताचा पहिला डाव 2 बाद 62 धावांवर थांबला

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Saturday, 16 January 2021

ब्रिस्बेन कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात 369 धावा केल्या.

Australia vs India  4th Test Day 2 : ब्रिस्बेन कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात 369 धावा केल्यानंतर भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावाला सुरुवात केली. भारतीय संघाची सुरुवात खराब झाली असून सलामीवीर शुभमन गीलच्या रुपात भारतीय संघाला पहिला धक्का बसला आहे. कमिन्सने ऑस्ट्रेलियन संघाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर रोहित शर्माने पुजाराच्या साथीन डाव सावरला. तो अर्धशतकी खेळी करेल असे दिसत असातना लायनने त्याच्या खेळी ब्रेक लावला. रोहितच्या रुपात टीम इंडियाला दुसरा धक्का बसला आहे. रोहित शर्माने 6 चौकाराच्या मदतीने  74 चेंडूत 44 धावा केल्या. 

चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात पावसाने आपली बॅटिंग सुरु केली आहे. परिणामी खेळ थांबण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सामना थांबवण्यात आला त्यावेळी पुजारा 49 चेंडूंचा सामना करुन 8 धावांवर तर कर्णधार अजिंक्य रहाणे 19 चेंडूत 2 धावांवर खेळत होते. पाऊस थांबल्यानंतर मैदानावरील ओलसरपणामुळे दुसऱ्या दिसांतील खेळ पुढे होऊ शकला नाही.  दुसऱ्या दिवशी ज्यावेळी खेळ थांवला तेव्हा भारतीय संघाने 2 बाद 62 धावा केल्या होत्या. अजिंक्य रहाणे आणि पुजारा मैदानात होता. 

Aus vs Ind 4th Test : पहिला दिवस लाबुशेन-टी नटराजन यांनी गाजवला!

ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या दिवसाअखेर 5 बाद 274  धावा केल्या होत्या. कर्णधार टिम पेन 38 (62) आणि कॅमरुन ग्रीन 28(70) धावांवरुन दुसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात केली. पंतने अर्धशतकी खेळी केली. ग्रीन 47 धावांवर बाद झाला. तळाच्या फलंदाजीत स्टार्क 20, लायन 24 आणि हेजलवूड 11 धावा केल्या. टी नटराजन, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या. सिराजला 1 विकेट मिळाली.


​ ​

संबंधित बातम्या