Sydney Test Records: ऑस्ट्रेलियाच्या बाल्लेकिल्ल्यात टीम इंडियाने केली विक्रमांची बरसात

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Monday, 11 January 2021

ज्या सिडनीच्या मैदानात ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व राहिले आहे. त्या ठिकाणी टीम इंडियाने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली.

AusvsInd Records : ज्या सिडनीच्या मैदानात ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व राहिले आहे. त्या ठिकाणी टीम इंडियाने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. सिडनीच्या मैदानातील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा 13 वा  कसोटी सामना होता. यापूर्वी टीम इंडियाने याठिकाणी 12 सामने खेळले होते. यातील 5 सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता तर 6 सामने अनिर्णित राहिले होते. केवळ एका सामन्यात टीम इंडियाला यश मिळाले होते. यात आता आणखी एका अनिर्णत सामन्याची भर पडली.  क्रिकेटच्या इतिहासात 41 वर्षानंतर चौथ्या डावात टीम इंडियाने 100 पेक्षा अधिक षटके फलंदाजी केली. भारतीय संघाने दुसऱ्या डावात तब्बल 131 षटके फलंदाजी केली. हा एक विक्रमच आहे. 

पुजारा-ऋषभ पंतने मोडला 72 वर्षांपूर्वीचा विक्रम 

सिडनी कसोटी सामन्यात पुजारा आणि पंत या जोडीनं  43.3 षटकांत 148 धावांची भागीदारी केली. चौथ्या डावात सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम नोंदवला. ऑस्ट्रेलियातील ही दुसऱ्या क्रमांकाची मोठी भागीदारी आहे. 1949 मध्ये विजय हजारे आणि रशियन मोदी यांनी चौथ्या डावात अखेरच्या दिवशी 139 धावांची भागीदारी रचली होती.  

सर्वाधिक षटके खेळण्याचा अनोखा विक्रम 

भारतीय संघाने चौथ्या डावात 131 षटके खेळून एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला. चौथ्या डावात सर्वाधिक षटके खेळून काढणारा टीम इंडिया आशियातील पहिला संघ आहे. याशिवाय अखेरच्या डावात सर्वाधिक षटके खेळून सामना अनिर्णत राखणाऱ्या संघाच्या यादीत भारत चौथ्या स्थानावर आहे. 1979 मध्ये भारताने सर्वाधिक 150.5 षटके खेळली होती. 

AUSvsIND 3rd Test: व्वा रे वाघा! जखमी होऊनही कांगारूंना फोडला घाम!

हनुमा विराही-अश्विन जोडीचा विक्रम 

हनुमा विहारी आणि आर अश्विन यांच्या चिवट खेळीमुळे भारतीय संघाला सामना वाचवणे शक्य झाले. या जोडीने 259 चेंडूचा सामना करुन नाबाद 62 धावा काढल्या. भारताकडून सहाव्या विकेटसाठी सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रम हनुमा विहारी आणि अश्विनच्या नावे झालाय. 1992 नंतर पहिल्यांदाच भारताच्या चार गड्यांनी 100 पेक्षा अधिक चेंडू खेळण्याचा पराक्रम केला.  


​ ​

संबंधित बातम्या