AusvsInd : अन् मोठा मासा गळाला लागला

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Monday, 28 December 2020

लेगसाईडला पडलेला चेंडू ऑफसाईडला सरकून खेळताना दांड्या कधी उडल्या हे स्मिथला कळलच नाही.

Australia vs India 2nd Test : पहिल्या कसोटीत सपाटून मार खाल्यानंतर मेलबर्नच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दिमाखदार पदार्पण केले आहे. अजिंक्य रहाणेची शतकी खेळी (112) आणि रविंद्र जडेजाच्या (57) अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात 300 चा टप्पा पार केला. तळाची फलंदाजी पुन्हा बारगळल्यामुळे पहिल्या डावात भारतीय संघाने 326 पर्यंत मजल मारली. भारतीय संघाला 131 धावांची आघाडी मिळाली असून या धावा करुन ऑस्ट्रेलियाला भारतासमोर टार्गेट सेट करायचे आहे. 

ऑस्ट्रेलियन संघाच्या दुसऱ्या डावाची सुरुवातही खराब झाली. उमेश यादवने जो बर्न्सला अवघ्या 4 धावांवर माघारी धाडले. संघाची मोठी मदार असलेल्या मार्नस लाबुशेन अश्विनच्या फिरकीत अडकला. या दोन धक्क्यातून सावरण्यासाठी स्मिथकडे ऑस्ट्रेलियाचा नजरा खिळल्या होत्या. पण बुमराहने त्याची बत्ती गूल केली. 8 धावा करण्यासाठी 30 चेंडू खेळलेल्या स्मिथला बुमराहने बोल्ड केले. लेगसाईडला पडलेला चेंडू ऑफसाईडला सरकून खेळताना दांड्या कधी उडल्या हे स्मिथला कळलच नाही. ही विकेट भारतासाठी खूप मोठी विकेट आहे. 

AUSvsIND : तिसऱ्या कसोटी सामन्यावर अनिश्चितीचे काळे ढग

स्मिथमध्ये डाव सावरण्याची आणि गेलेला सामना पुन्हा ओढून आणण्याची क्षमता आहे. त्याची तुलना नेहमीच भारतीय संघाचा लिव्हवर असलेल्या विराट कोहलीशी केली जाते. पण स्मिथ दुसऱ्या वनडेत सपशेल अपयशी ठरला. पहिल्या डावातही त्याला समाधानकारक धावा करता आल्या नव्हत्या. भारतीय गोलंदाजांनी त्याच्याविरोधात चांगली गोलंदाजी केली. पहिल्या डावात अश्विनने स्मिथला खातेही उघडू दिले नव्हते.


​ ​

संबंधित बातम्या