AusvsInd Boxing Day Test : झेल होणार की झोल, अश्विनला धडकी भरवणारा क्षण

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Saturday, 26 December 2020

अखेर सनियर सर जडेजाने हा झेल टिपला आणि मॅथ्यू वेडला माघारी परतावे लागले. हा क्षण फिरकीपटू अश्विनची धडधड वाढवणारा असाच होता. झेल होणार की झोल, अशी चिंता अश्विनला क्षणभरासाठी निश्चितच सतावली असेल.

AusvsInd Melbourne Boxing Day Test : पिंक बॉलवर दैना झालेल्या टीम इंडियाने अंजिक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या कसोटी सामन्यात दमदार सुरुवात केली आहे. जसप्रीत बुमराहने बर्न्सच्या रुपात पहिले यश मिळवून दिल्यानंतर अनुभवी अश्विनच्या फिरकीने कांगारु अडचणीत सापडले आहेत.  मॅथ्यू वेड संघाचा डाव सावरेल, असे चित्र दिसत असताना उत्तुंग फटका खेळण्याच्या नादात तो बाद झाला. त्याचा झेल घेण्यासाठी पहिला कसोटी सामना खेणारा शुभमन गिल आणि अष्टपैलू रविंद्र जडेजा यांच्यात रेस पाहायला मिळाली. अखेर सनियर सर जडेजाने हा झेल टिपला आणि मॅथ्यू वेडला माघारी परतावे लागले. हा क्षण फिरकीपटू अश्विनची धडधड वाढवणारा असाच होता. झेल होणार की झोल, अशी चिंता अश्विनला क्षणभरासाठी निश्चितच सतावली असेल.

युएईत रंगलेल्या आयपीएल स्पर्धेत शुभमन गीलच्या फटकेबाजीसह त्याच्या क्षेत्ररक्षणाचा नजराणा क्रिकेट चाहत्यांनी अनुभवला आहे. पहिला कसोटी सामना खेळताना योगदान देण्यासाठी तो किती उत्सुक आहे, याचीच झलक या कॅचवेळी जिंकली. फलंदाजीला आपला नंबर येण्यापूर्वी क्षेत्ररक्षणावेळी त्याची दिसलेली धडपड ही कौतुकास्पद होती. त्याच्याशिवाय मोहम्मद सिराजही कसोटीत पदार्पण करतोय. भारताची दमदार सुरुवात युवा खेळाडूंचा दबाव कमी करणारे असून ही जोडी कशी कामगिरी करतेय ते पाहण्याजोगे असेल. अष्टपैलू रविंद्र जडेजाला पहिल्या कसोटी सामन्यात संधी मिळाली नव्हती. संधी मिळताच त्याने आपल्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा दाखवून दिला. त्याच्याकडून क्षेतरक्षणाप्रमाणेच गोलंदाजी आणि फलंदाजीकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. 

'बॉक्सिंग डे' सामना म्हणजे काय ? घ्या जाणून

ऑस्ट्रेलियन संघाच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय भारतीय संघाने फोल ठरवलाय. पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांसमोर आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकली. सलामीवीर बर्न्सला बुमराहने खातेही उघडू दिले नाही. त्याच्यानंतर अश्विनने आपल्या फिरकीतील कमाल दाखवून देत दोन विकेट घेतल्या. त्याने सलामीवीर मॅथ्यू वेडला 30 धावांवर चालते केले. रविचंद्रन अश्विनने त्याचा अप्रतिम झेल टिपला. याशिवाय स्मिथच्या रुपात अश्विनने संघाला मोठे यश मिळवून दिले. स्मिथला 8 चेंडू खेळूनही खाते उघडता आले नाही. उपहारापर्यंत ऑस्ट्रेलियाने 3 बाद 65 धावा केल्या होत्या. लाबुशेन 26 (68) ट्रॅविस हेड 4 (37) धावांवर खेळत होते. 
 


​ ​

संबंधित बातम्या