Melbourne Boxing Day Test AusvsInd : बॉक्सिंग डे टेस्टमध्ये भोपळ्याचा सिलसिला!

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Saturday, 26 December 2020

यापूर्वीच्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातही बर्न्सला खाते उघडता आले नव्हते. गतवर्षी न्यूझीलंड विरुद्धच्या बॉक्सिंग डे सामन्यात बर्न्सवर गोल्डन डकची नामुष्की ओढावली होती या सामन्यातील दुसऱ्या डावात बर्न्सने 35 धावा केल्या होत्या. 

Australia vs India  2nd Test Day 1 : मेलबर्नच्या मैदानात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कार्यवाहू  कर्णधार अजिंक्य रहाणेला नाणेफेक जिंकण्यात अपयश आले. मात्र जसप्रीत बुमराहने सलामी जोडी फोडत मॉर्निंग सेशनमध्ये ऑस्ट्रेलियाला दणका दिला. त्याने सलामीवीर जो बन्सला खातेही उघडू दिले नाही. बर्नसने 10 चेंडूचा सामना केला. बुमराहने अचुक टप्प्यावर चेंडू टाकत बर्न्सला खेळण्यास मजबूर केले आणि त्याला पंतच्या हाती झेल देऊन तंबूत परतावे लागले.

यापूर्वीच्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातही बर्न्सला खाते उघडता आले नव्हते. गतवर्षी न्यूझीलंड विरुद्धच्या बॉक्सिंग डे सामन्यात बर्न्सवर गोल्डन डकची नामुष्की ओढावली होती या सामन्यातील दुसऱ्या डावात बर्न्सने 35 धावा केल्या होत्या. बर्न्सने 2014 मध्ये भारताविरुद्धच्या सामन्यात बॉक्सिंग डे कसोटीतून आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळण्यासा सुरुवात केली होती. त्याने आतापर्यंत 22 सामने खेळले असून 38 डावात त्याच्या नावे 1438 धावा आहेत. यात 4  शतके आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे. 180 धावा ही त्याची सर्वोच्च खेळी आहे. 

'बॉक्सिंग डे' सामना म्हणजे काय ? घ्या जाणून

पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात बर्न्सने 8 धावांची खेळी केली होती. याच सामन्यातील दुसऱ्या डावात त्याने 51 धावांची नाबाद खेळी करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. पहिल्या कसोटी सामन्यातील नाबाद अर्धशतकी खेळीमुळे तो संघाला दमदार सुरुवात करुन देण्यात यशस्वी ठरेल असे वाटले होते. पण जसप्रीत बुमराहने त्याला मॉर्निग वॉकचा वॉर्मअप केल्यासारखे अवघ्या काही मिनिटात तंबूचा रस्ता दाखवला.

पहिल्या धक्क्यातून सावरत ऑस्ट्रेलियासमोर डाव सावरण्याचे आव्हान आहे. मेलबर्नच्या मैदानातील विजयासह आघाडी भक्कम करण्याचा यजमानांचा प्रयत्न असेल. दुसरीकडे टीम इंडिया पहिल्या कसोटी सामन्यातील पराभव विसरुन मालिकेत कमबॅक करण्यासाठी प्रयत्नशील असेल.भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. यंदाच्या वर्षात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फार क्रिकेट झालेले नाही. या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे वर्षाचा समारोप विजयाने करण्याचा प्रयत्न भारतीय संघाचा नक्कीच असेल.


​ ​

संबंधित बातम्या