AUS vs IND , 2nd T20I : टीम इंडियासमोर 195 धावांचे लक्ष्य

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 6 December 2020

विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. फिंचच्या अनुपस्थितीत मॅथ्यू हेड आणि डार्सी शॉर्टने ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरुवात केली.

कार्यवाहू कर्णधार मॅथ्यू हेडचे अर्धशतक (58) आणि त्यानंतर स्मिथनं हेन्रिक्सच्या साथीनं केलेली 48 धावांची महत्वपूर्ण भागीदारीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने टीम इंडियासमोर 195 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. फिंचच्या अनुपस्थितीत मॅथ्यू हेड आणि डार्सी शॉर्टने ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरुवात केली. धावफलकावर 47 धावा असताना नटराजनने शॉर्टला तंबूत धाडले. मॅथ्यूनं 58 धावा करुन विकेट फेकली. कोहली-राहुलनं त्याला धावबाद केले.

ग्लेन मॅक्सवेल 22 धावांची भर घालून तंबूत परतल्यानंतर स्मिथने हेन्रिक्सच्या साथीन 48 धावांची भागीदारी करत संघाची धावसंख्या 170+ वर नेली. अखेरच्या टप्प्यात फटकेबाजी करण्याच्या नादात चहलच्या गोलंदाजीवर स्मिथ झेलबाद झाला. अखेरच्या षटकात स्टॉयनिसच्या फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलिया संघाने निर्धारित 20 षटकात 5 बाद 194 धावांपर्यंत मजल मारली.  


​ ​

संबंधित बातम्या