AUS vs IND 1st Test Day 2 : टीम इंडिया फ्रंटफूटवर आली, पण...

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Friday, 18 December 2020

पहिल्या दिवसाअखेर 6 बाद 233 धावांवारुन टीम इंडियाने खेळायला सुरुवात केली. स्टार्क आणि कमिन्सच्या माऱ्यासमोर भारताच्या तळाची फलंदाजी थोडक्यात आटोपली. अवघ्या 11 धावांत भारताने पहिल्या सत्रातच 4 विकेट गमावल्या.

Australia vs India 1st Test Day 2 : जसप्रीत बुमराह आणि उमेश यादवचा  भेदक मारा आणि त्यानंतर अश्विनने दाखवलेली फिरकीतील कमाल याच्या जोरावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला बॅकपूटव टाकले. आघाडीच्या फ्लॉपशोनंतर टीम पेनने केलेल्या अर्धशतकीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाला 191 धावांपर्यंत मजल मारता आली.  53 धावांच्या आघाडीसह टीम इंडियाने दुसऱ्या डावाला सुरुवात केली. पृथ्वी शॉच्या रुपात भारताने पहिली विकेट गमावली. कमिन्सनं त्याला 4 धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मयांक अगरवाल 5 आणि जसप्रीत बुमराह 0 धावांवर खेळत होते.  

पहिल्या दिवसाअखेर 6 बाद 233 धावांवारुन टीम इंडियाने खेळायला सुरुवात केली. स्टार्क आणि कमिन्सच्या माऱ्यासमोर भारताच्या तळाची फलंदाजी थोडक्यात आटोपली. अवघ्या 11 धावांत भारताने पहिल्या सत्रातच 4 विकेट गमावल्या. भारताने पहिल्या डावात सर्व बाद 244 धावा केल्या. त्यानंतर बॅटिंगला आलेल्या कांगारुंची सुरुवात खराब झाली. भारतीय संघाच्या भेदक माऱ्यासमोर सलामी संघर्ष करताना दिसली. संघाचे खाते उघडण्यासाठी ऑस्ट्रेलियन सलामवीरांनी 28 चेंडू खेळले.  

सवंगडी मैदान सोडून जात असताना लाबुशेनला लाभली नशीबाची साथ (Video)

त्यानंतर मॅथ्यू हेड (8) आणि जो बर्न्स (8) स्वस्तात माघारी फिरले. स्मिथच्या रुपात भारताला मोठे यश मिळाले. 29 चेंडूत 1 धाव करणाऱ्या स्मिथला अश्विने तंबूत धाडले. ट्रॅविस हेड (7), कॅमरुन ग्रीन (11), हे देखील अश्विनच्या फिरकीत अडकले. 

जीवदान मिळालेल्या मार्नस लाबुशेन अर्धशतकाकडे वाटचाल सुरु असताना उमेश यादवने आपल्या गोलंदाजीतील धार दाखवली. त्याने 47 धावांवर धोकादायक लाबुशेनला  तंबूचा रस्ता दाखवला. पॅट कमिन्सला यादवनं खातेही उघडू दिले नाही. मिचेल स्टार्क रन आउट झाला. त्याने कर्णधाराला साथ देण्याचा उत्तम प्रयत्न करताना 15 धावांची भर घातली. नॅथन लायनच्या रुपात अश्विने चौथी शिकार केली. उमेश यादवनं लायनला बाद करत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 191 धावांवर आटोपला. 


​ ​

संबंधित बातम्या