AUS vs IND, 1st Test Day 1 : पहिल्या दिवसाअखेर टीम इंडिया बॅकफूटवर!

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Thursday, 17 December 2020

कर्णधार कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी 88 धावांची भागीदारी करत संघाला बॅकफूटवर आणण्याचा प्रयत्न केला. पण अखेरच्या टप्प्यात दोघांनी विकेट फेकल्या. विराट कोहली 74 धावांवर धावबाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे 42 धावा करुन परतला.

India Tour of Australia  1st Test Pink Ball, Day 1 : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. शुभमन गिलला बाकावर बसवून थोडाफार अनुभव गाठीशी असलेल्या पृथ्वी शॉला संधी देण्यात आली होती. पण त्याला आपल्यातील क्षमता दाखवून देण्यात पुन्हा अपयश आले. सराव सामन्याप्रमाणे पहिल्या डावात पृथ्वी शॉला खातेही उघडता आले नाही. 

मयांक अग्रवालसोबत त्याने भारताच्या डावाला सुरुवात केली. पण पहिल्याच षटकात तो गडबडला. स्टार्कने दुसऱ्याच चेंडून त्याला शून्यावर माघारी धाडले. मयांक अग्रवाल 17 धावा करुन परतला. ही जोडी माघारी फिरल्यानंतर पुजारा आणि कोहलीने 68 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. पुजाराने 43 धावांचे योगदान दिले. कसोटी स्पेशलिस्ट पुजारा मैदानात होता तोपर्यंत भारतीय संघ कमबॅक करण्याची आस होती. दुसऱ्या बाजूला कर्णधार विराट कोहली मैदानात होता. मैदानात नांगर टाकण्याची खासियत असलेल्या पुजाराला नॅथन लायनने आपल्या जाळ्यात अडकवले. 

Australian Open 2021 ठरलेल्या वेळेतच; वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम पक्की

त्यानंतर कर्णधार कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी 88 धावांची भागीदारी करत संघाला बॅकफूटवर आणण्याचा प्रयत्न केला. पण अखेरच्या टप्प्यात दोघांनी विकेट फेकल्या. विराट कोहली 74 धावांवर धावबाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे 42 धावा करुन परतला. हनुमा विहारी 16 धावांतच आटोपला. परिणामी पहिल्या दिवसाअखेर भारताने 6 बाद 333 धावांपर्यंत मजल मारली. वृद्धीमान साह 9 तर अश्विन 15 धावांवर खेळत होते. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कने 2, हेजलवूड, नॅथन लायन, पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. 

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा जानेवारी - फेब्रुवारीत? 

दुसऱ्या दिवसाच्या खेळात ऑस्ट्रेलियन गोलंदाज भारतीय संघाला लवकरात लवकर आटोपून बॅटिंग करण्याच्या नादात असतील. वृद्धिमान साहा आणि अश्विनमध्ये धावा करण्याची क्षमता आहे. याशिवाय सराव सामन्यात बुमराहनेही आपल्या भात्यातील फटकेबाजी दाखवली आहे. एकंदरीत तळाची फलंदाजांच्या योगदानावर भारतीय संघ 300 चा पल्ला गाठू शकला तर ती संघाच्या दृष्टीने सकारात्मक गोष्ट ठरेल. 


​ ​

संबंधित बातम्या