AUS vs IND : 9 8 4 4 4 2 0 0 0 4 मोबाईल नंबर नव्हे.. हे तर टीम इंडियाचं स्कोअरकार्ड!

सुशांत जाधव
Saturday, 19 December 2020

कसोटी स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजारा, उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि अश्विनला खातेही उघडता आले नाही. हे तिघे शून्यावर बाद झाले.

Australia vs India  1st Test : ऍडलेडच्या मैदानावर सुरु असलेल्या पिंक बॉल कसोटीत भारतीय संघावर पटणार नाही अशी नामुष्की ओढावली. दुसऱ्या डावात टीम इंडियाच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाढता आला नाही. पॅट कमिन्स आणि हेजलवूडच्या माऱ्यासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी अक्षरश: गुडघे टेकले. भारताच्या दुसऱ्या डावात हेजलवूडने अर्धा संघ तंबूत धाडला. तर कमिन्सने चौघांना बाद केला. या सामन्यात एका भारतीय फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. 

दुसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघाने पथ्वी शॉच्या रुपात एक विकेट गमावली होती. तो 4 धावा करुन माघारी फिरला होता. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात भारतीय संघ ढेपाळला. सराव सामन्यात अर्धशतकी करणाऱ्या बुमराहला नाईट वॉचमन म्हणून पाठवले होते. त्याला केवळ दो धावा करता आल्या. भारताकडून सलामीवर मयांक अगरवालची खेळी सर्वोच्च ठरली. तो 9 धावांवर बाद झाला. त्याच्यापाठोपाठ अष्टपैलू हनुमा विहारीनं 8 धावा केल्या. कर्णधार विराट कोहली, वृद्धीमान साहा, पृथ्वी शॉ आणि नाबाद राहिलाला उमेश यादव या चौंघांच्या खात्यावर 4 धावा जमा झाल्या. 

कसोटी स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजारा, उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि अश्विनला खातेही उघडता आले नाही. हे तिघे शून्यावर बाद झाले. रिटायर हर्ट होण्यापूर्वी मोहम्मद शमीने एका धावनं खाते उघडले. दुसऱ्या डावात केवळ चारच चौकार पाहायला मिळाले. मयांक अग्रवाल, कोहली, हनुमा विहारी आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी एक-एक चौकार खेचला.
 


​ ​

संबंधित बातम्या