AusvsIND 1st Test Day 3 :टीम इंडियाचे शेर तिसऱ्याच दिवशी ढेर! कांगारुंची मालिकेत 1-0 आघाडी

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Saturday, 19 December 2020

अवघ्या 19 धावांवर टीम इंडियाने 6 विकेट्स गमावल्या आहेत.

Australia vs India  1st Test Day 3  : यजमान कांगारुंनी पिंक बॉल टेस्टमध्ये पाहुण्या टीम इंडियाला 8 गडी आणि दोन दिवस राखून पराभूत केले. तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचा डाव 36 धावात आटोपत कांगारुंनी तिसऱ्या दिवशीच खेळ खल्लास करण्याचे संकेत दिले. विजयाची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी मेथ्यू वेड आणि जो बर्न्स जोडी मैदानात उतरली. सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. मेथ्यू वेड 33 धावांवर धावबाद होऊन परतल्यानंतर जो बर्न्सने अर्धशतक झळकावले. वेडची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेला लाबुशेन 6 धावांची भर घालून माघारी फिरला. बर्न्स 51 आणि स्मिथ 1 धावेवर नाबाद राहत ऑस्ट्रेलियाने पहिला कसोटी सामना आपल्या नावे करत 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 
 

पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 62 धावांची आघाडी घेणाऱ्या टीम इंडियाचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. दुसऱ्या दिवसाखेर भारतीय संघाची अवस्था 1 बाद 9 अशी होती. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात भारताची अवस्था बिकट झाली. कमिन्सनं नाईट वॉचमन बुमराहला 2 धावांवर बाद केल. कसोटी स्पेशलिस्ट दुसऱ्या डावात खातेही उघडू शकला नाही. कमिन्सन त्याची विकेट घेतली. हेजलवूनडे मयांकला माघारी धाडले. त्याने 9 धावा केल्या. उपकर्णधार अजिंक्य रहाणेला हेजलवूनडने खाते उघडू दिले नाही. कमिन्सने कोहलीला 4 धावांवर माघारी धाडले. अवघ्या 19 धावांवर टीम इंडियाने 6 विकेट्स गमावल्या आहेत.


​ ​

संबंधित बातम्या