AUSvsIND 1st Test Day 1 : विराट खेळी बहरता बहरता गडबडली!

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Thursday, 17 December 2020

कोहलीने पहिल्या डावातील 61 व्या षटकात अर्धशतक पूर्ण केले.  कमिन्सच्या षटकात एकेरी धाव घेत कोहलीने अर्धशतक पूर्ण केले. यासाठी त्याने 123 चेंडूचा सामना केला.

Australia vs India  1st Test Day 1 : सलामीवीरांच्या फ्लॉपशोनंतर प्रथम बॅटिंग घेण्याचा निर्णय सार्थ ठरवण्यासाठी विराट कोहली मैदानात तग धरुन उभा आहे. पहिल्या दोन विकेट झटपड पडल्यानंतर भारतीय संघ बॅकफूटवर आला होता. पुजाराच्या साथीनं कोहलीनं संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

धावफलकावर शंभर धावा लागल्यावर पुजारा बाद झाला. नॅथन लायनने त्याला आपल्या जाळ्यात अडकवले. पुजाराने संघाच्या धावसंख्येत 43 धावांची भर घातली. कोहलीसोबत त्याने 68 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. त्यानंतर कोहलीने पहिल्या डावातील 61 व्या षटकात अर्धशतक पूर्ण केले.  कमिन्सच्या षटकात एकेरी धाव घेत कोहलीने अर्धशतक पूर्ण केले. यासाठी त्याने 123 चेंडूचा सामना केला. 

पृथ्वीचा फ्लॉप शो; टीम इंडियाला गोत्यात आणणारा

यंदाच्या हंगामात (2020) विराटच्या बॅटमधून शतकी खेळी पाहायला मिळालेली नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सामन्यात तो 89 धावांवर अडखळला होता. वर्षातील ही त्याची सर्वोच्च खेळी आहे. या सामन्यात भारतीय संघाला टिकवून ठेवण्यासाठी विराट अधिक काळ मैदानात राहणे गरजेचे होते. सुरुवातीच्या धक्क्यातून संघाला सावरताना त्याने आपली भूमिका चोख बजावली.  तो आपल्या खात्यात शतकी खेळीची भर घालणार असे वाटत असताना अजिंक्य रहाणे आणि त्याच्यातील ताळमेळ गडबडला. विराट कोहलीला 74 धावांवर धावबाद होऊन तंबूत परतावे लागले. 

यापूर्वी विराट कोहली न्यूझीलंडविरुद्ध 4 सामन्यांची कसोटी खेळला होता. यावेळी तो सपशेल अपयशी ठरला होता. यंदाच्या वर्षातील त्याच्यासाठी ही अखेरची कसोटी आहे. पहिल्या कसोटीनंतर तो मायदेशी परतणार आहे. त्यामुळे अर्धशतकी खेळी शतकात रुपांतर करुन संघाला मजबूत स्थितीत घेऊन जाण्याचा त्याचा प्रयत्न थोडा अपूराच पडला.


​ ​

संबंधित बातम्या