पृथ्वीचा फ्लॉप शो; टीम इंडियाला गोत्यात आणणारा

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Thursday, 17 December 2020

स्टार्कने फोल ठरवला. त्याने पहिल्याच षटकात पृथ्वी शॉच्या रुपात भारताला पहिला धक्का दिला.

India Tour of Australia Border Gavaskar Trophy 2020 1st Test Pink Ball, Day 1  ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराट कोहलीचा हा निर्णय ऑस्ट्रेलियान जलदगती गोलंदाज मिशेल स्टार्कने फोल ठरवला.

स्टार्कने पहिल्याच षटकात पृथ्वी शॉच्या रुपात भारताला पहिला धक्का दिला. सराव सामन्यात दमदार कामगिरी केलेल्या शुभमन गिलऐवजी विराटने पहिल्या कसोटीसाठी पृथ्वी शॉला पसंती दिली होती. न्यूझीलंड दौऱ्यावरही त्याला नावाला साजेसा खेळ करता आला नव्हता. मिळालेल्या संधीच सोन करण्यात पृथ्वी पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. 

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील फ्लॉपशोनंतर सोशल मीडियावर नेटकरी पृथ्वी शॉल ट्रोल करत आहेत. शुभमन गिलच्या सराव सामन्यातील दमदार कामगिरीनंतर रोहित शर्माच्या अनुपस्थितीत मयांकसोबत शुभमन गिलला संधी मिळेल, अशी चर्चा रंगली होती. त्याने सराव सामन्यात आपल्यातील क्षमता दाखवून दिल्यामुळे पृथ्वीपेक्षा त्याची दावेदारी मजबूत वाटत होती. पण अनुभवाच्या जोरावर पृथ्वीला पसंती मिळाली. आणि शुभमन गिलचे पदार्पण लांबणीवर पडले.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पृथ्वीची सुरुवातच खराब झाली होती. ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यातही त्याला खाते उघडता आले नव्हते. पहिल्या डावात शून्यावर बाद झाल्यानंतर दुसऱ्या डावात त्याने 19 धावा केल्या होत्या. दुसऱ्या सराव सामन्यात शॉने 29 चेंडूत 40 धावांची खेळी केली होती. दुसरीकडे शुभमन गिलने अर्धशतकी खेळी करुन लक्ष वेधले होते.


​ ​

संबंधित बातम्या