Australia vs India कांगारुंना मोठा धक्का; वॉर्नर पहिल्या टेस्टमधून आउट

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Wednesday, 9 December 2020

वॉर्नरने दुखापतीतून सावरत असल्याचे म्हटले आहे. सध्याच्या घडीला स्वत:ला आणि संघ सहकाऱ्यांना 100 टक्के फिट असल्याचे विश्वास द्यावा लागणार आहे, असेही वॉर्नरने म्हटले आहे.

Australia vs India border gavaskar trophy 2020 :  भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर 17 डिसेंबरपासून रंगणाऱ्या कसोटीला मुकणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बुधवारी याची पुष्टी केली आहे. अॅडलेडच्या कसोटीला ऑस्ट्रेलियन संघाला त्याच्याशिवाय मैदानात उतरावे लागले होते. एकदिवसीय सामन्यात वॉर्नरने धमाकेदार कामगिरी केली होती. त्याच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियन संघावर टी-20 मालिका गमावण्याची वेळ आली होती. 

वॉर्नरने दुखापतीतून सावरत असल्याचे म्हटले आहे. सध्याच्या घडीला स्वत:ला आणि संघ सहकाऱ्यांना 100 टक्के फिट असल्याचे विश्वास द्यावा लागणार आहे, असेही वॉर्नरने म्हटले आहे. वॉर्नरच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियन संघात कोणाची वर्णी लागणार हे अद्याप अस्पष्ट आहे. कॅमरन ग्रीनने ऑस्ट्रेलिया अ कडून खेळताना शतकी खेळी केली होती. भारतीय संघाची मजबूत गोलंदाजीसमोर त्याने केलेल्या कामगिरीमुळे वॉर्नरच्या जागेवर त्याला संधी मिळू शकते. त्याच्याशिवाय  पुकोवस्की आणि अनुभवी जो बर्न्स यांची नावे देखील आघाडीवर असतील.  


​ ​

संबंधित बातम्या