Aus vs Ind 1st ODI Live : फिंच-स्मिथचा शतकी धमाका; टीम इंडियासमोर 375 धावांचा डोंगर

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 27 November 2020

सिडनीच्या मैदानात ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ मोठ्या ब्रेकनंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला असून ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या सुरुवातीला ते कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

Australia vs India 1st ODI : कर्णधार एरॉन फिंचचे शतक आणि स्मिथने अवघ्या 66 चेंडूत केलेली धमाकेदार शतकी खेळी याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतीय संघासमोर 375 धावांचे आव्हान ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली. वॉर्नर 69 धावांचे योगदान देऊन माघारी फिरला.

 फिंचने कर्णधाराला साजेसा खेळ करत 114 धावांचे योगदा दिले. तर स्मिथनं आक्रमक खेळाचा नमुना पेश करत 66 चेंडूत 105 धावा कुटल्या. अखेरच्या षटकात मॅक्सवेलनं 19 चेंडूत 45 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या चौघांच्या दमदार खेळीच्या जोरावर प्रथम फंलदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने निर्धारित 50 षटकात 6 बाद 374 धावा करत भारतासमोर 375 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. बुमराह, नवदीप सैनी आणि चहल यांना प्रत्येकी एक-एक बळी मिळवता आला. 

Live Updated 

India  (Playing XI): भारतीय संघ  : शिखर धवन, मयांक अगरवाली, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, मोहम्मद शामी, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह

Australia (Playing XI): एरॉन फिंच (कर्णधार)  डेविड वॉर्नर, स्टिव्हन स्मिथ, मार्कस स्टॉयनिस, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, एलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, एडम झम्पा, जोश हेजलवूड, 


​ ​

संबंधित बातम्या