INDvsAUS : ऑस्ट्रेलियाला धक्का; तिसऱ्या वन-डे व टी-ट्वेन्टीमधून हुकमी एक्का 'आऊट'   

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 November 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर दुखापतग्रस्त झाला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर दुखापतग्रस्त झाला. आणि त्यामुळे तो उर्वरित एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी सामन्याच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. वॉर्नरच्या जागी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट निवड समितीने डार्सी शॉर्टला टी -20 मालिकेसाठी संघात स्थान दिले आहे.  

विराटची कॅप्टन्सी समजण्यापलीकडे; गौतम गंभीरची टीका   

भारत आणि  ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात वॉर्नरला भारतीय डावाच्या चौथ्या षटकात क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली. वॉर्नरची दुखापत गंभीर असल्याने त्याला कसोटी मालिकेच्या दृष्टीने आगामी टी -20 आणि उर्वरित एकदिवसीय सामन्यातून वगळण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील पहिला कसोटी सामना 17 डिसेंबरला ऍडिलेड येथे खेळला जाणार असून ही डे-नाईट कसोटी असेल. मिड-ऑफवर दुखापत होण्यापूर्वी वॉर्नरने फलंदाजी करताना 83 धावांची शानदार खेळी केली होती. एकदिवसीय मालिकेचा अंतिम सामना बुधवारी कॅनबेरा येथे खेळवला जाईल. मर्यादित षटकांच्या मालिकेनंतर चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल.

"भारत-पाक 'मॅटर' ICC च्या आवाक्याबाहेरचा"

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. आणि या परभवाबरोबरच भारताला मालिका देखील गमावण्याची नामुष्की ओढवली. पहिल्या सामन्याप्रमाणे या सामन्यात देखील ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना वॉर्नर, फिंच, लबशेन व मॅक्सवेल यांच्या अर्धशतकीय आणि स्मिथ याने  केलेल्या शतकीय खेळीमुळे भारतासमोर 390 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र भारताचा संघ  50 षटकात नऊ गडी गमावून 338 धावांपर्यंतच मजल मारू शकला. त्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या संघाने 2-0 ने वर्चस्व राखले आहे.     


​ ​

संबंधित बातम्या