वन-डेतील वर्चस्व कसोटीतही ठेवण्याचा ऑस्ट्रेलियास विश्‍वास

संजय घारपुरे
Monday, 30 November 2020

एकदिवसीय मालिकेतील विजयी आघाडीनंतर ऑस्ट्रेलियास विश्‍वास 

सिडनी : एकदिवसीय मालिकेत आम्ही वर्चस्व राखले आहे. त्यामुळे कसोटी मालिकेसाठीही आम्ही मानसिक हुकूमत मिळवली आहे, असे ऑस्ट्रेलियाचा अव्वल फलंदाज मार्नस लॅबुशॅग्ने याने सांगितले. एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोनही लढतीत ऑस्ट्रेलियाने एकतर्फी विजय मिळवले आहेत. 

INDvsAUS : ऑस्ट्रेलियाला धक्का; तिसऱ्या वन-डे व टी-ट्वेन्टीमधून हुकमी एक्का...

ऑस्ट्रेलियास एकदिवसीय मालिकेतील तीनही सामन्यात मिळून एकत्रित धावांच्या विक्रमासाठी कॅनबेरात 204 धावांची गरज आहे, तर जागतिक विक्रमासाठी 292 धावांची. अर्थात त्याहीपेक्षा कसोटी मालिकेतही खेळणाऱ्या फलंदाजांनी राखलेले वर्चस्व त्यांना जास्त सुखावत आहे. स्टीव स्मिथ, डेव्हीड वॉर्नर आणि लॅबुशॅग्ने यांच्या धावा कांगारूंसाठी मोलाच्या आहेत. 

एकदिवसीय मालिकेतील वर्चस्वामुळे आमचा आत्मविश्‍वास नक्कीच उंचावला आहे. त्याचा कसोटी मालिकेत नक्कीच फायदा होईल. एकदिवसीय आणि कसोटी भिन्न असले तरी आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. धावा होत असल्या की हे घडते. स्मिथ, वॉर्नर एकदिवसीय मालिकेतील हुकूमत नक्कीच कसोटीतही राखेल, याबाबत मला खात्री आहे, असे लॅबुशॅग्ने याने सांगितले. 

विराटची कॅप्टन्सी समजण्यापलीकडे; गौतम गंभीरची टीका

इशांत शर्मा तंदुरुस्त नसल्याने आता एकदिवसीय मालिकेतील बहुतेक गोलंदाज कसोटीतही असतील. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराच्या गोलंदाजावर फलंदाजांनी वर्चस्व राखले आहे. रवींद्र जडेजाने अद्याप एकही विकेट घेतलेली नाही. लॅबुशॅग्ने याने ऑस्ट्रेलिया कसोटी संघातील सात जण शेफील्ड स्पर्धेत नुकतेच खेळले आहेत, याकडे लक्ष वेधले आहे. 

आमचे आघाडीचे खेळाडू गेल्या काही महिन्यात शेफील्ड ढाल स्पर्धेत खेळले आहेत. भारतीय खेळाडू कित्येक महिने चार दिवसांचे सामने खेळलेले नाहीत. त्यामुळे त्यांना मर्यादित षटकांच्या लढतींकडून दीर्घकालीन क्रिकेटसाठी गिअर बदलण्यास नक्कीच वेळ लागेल. 
- मार्नस लॅबुशॅग्ने, ऑस्ट्रेलियाचा अव्वल फलंदाज.


​ ​

संबंधित बातम्या