AUS A vs IND : बुमराहचा धमाका; कांगारुंचे खांदे पाडत झळकावली फिफ्टी!

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 11 December 2020

टीम इंडियाचे नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणे, रिषभ पंत आणि साहाला चमक दाखवता आली नाही. पंतने 11 चेंडूत 5 धावा केल्या. साहाला 22 चेंडूचा सामना करुनही खाते उघडता आले नाही. तर हनुमा विराही 15 धावाच करु शकला. अजिंक्य रहाणेने संघाच्या धावसंख्येत केवळ 4 धावांची भर घालता आली. 

Australia A vs India, 2nd Practice match : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलियन अ संघाविरुद्ध सराव सामन्यासाठी मैदानात उतरला आहे. सिडनीच्या मैदानात भारतीय संघाचा दुसरा सराव सामना सुरु आहे. सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी बुमराहने सर्वांना आश्चर्यचकित करणारी खेळी केली. त्याने गोलंदाजीत नव्हे तर फलंदाजीत कमाल करुन दाखवत ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध अर्धशतक झळकावले. भारतीय संघाने 123 धावांत 9 गडी गमावले असताना बुमराहने सिराजच्या साथीनं 79 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. या दोघांच्या खेळीमुळे संघाला 194 धावांपर्यंत मजल मारता आली. 

बुमराहने आपल्या 55 धावांच्या खेळीत 6 चौकार आणि 2 षटकार खेचले. त्याने 57 चेंडूत 96 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. दुसऱ्या बाजूला मोहम्मद सिराजने 34 चेंडूत 2 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 22 धावांचे योगदान दिले.  मयंक अगरवाल अवघ्या 2 धावा करुन तंबूत परतला. युवा क्रिकेटर पृथ्वी शॉ 40 आणि शुभमन गिलने 43 धावा करत संघाला मजबूत सुरुवात करुन दिली.  

हिटमॅन फिट है! टेस्ट पास झालेला रोहित प्लाइट कधी पकडणार?

टीम इंडियाचे नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणे, रिषभ पंत आणि साहाला चमक दाखवता आली नाही. पंतने 11 चेंडूत 5 धावा केल्या. साहाला 22 चेंडूचा सामना करुनही खाते उघडता आले नाही. तर हनुमा विराही 15 धावाच करु शकला. अजिंक्य रहाणेने संघाच्या धावसंख्येत केवळ 4 धावांची भर घालता आली. 

​ ​

संबंधित बातम्या