ग्रीनला 'रेड सिग्नल' दाखवणारा विराटचा अफलातून झेल पाहिलात का? (Video)

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Friday, 18 December 2020

ऑस्ट्रेलियाकडून पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या कॅमरुन ग्रीन अश्विनच्या फिरकीत अडकला. त्याने 11 धावांची खेळी केली. कॅमरुन ग्रीनने अश्विनच्या जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न फसला.

Aus Vs Ind: ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऍडलेडच्या मैदानात सुरु असलेल्या पहिल्या सामन्यात सोपे झेल सोडल्यानंतर कर्णधार विराट कोहलीनं (Virat Kohli) क्षेत्ररक्षणाचा भन्नाट नजराणा दाखवून दिला. पहिल्या डावात 74 धावा करुन अनलकी रन आउट झालेल्या कोहलीने क्षेत्ररक्षणातील दमदार कामगिरीने दुसऱ्या दिवशी टीम इंडियाला महत्त्वपूर्ण विकेट मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. कोहलीनं घेतलेला झेल इतका अफलातून होता की बाद झालेला फलंदाज कॅमरुन ग्रीन  (Cameron Green) कोहलीकडे काही क्षण बघतच उभा राहिला. 

ऑस्ट्रेलियाकडून पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या कॅमरुन ग्रीन अश्विनच्या फिरकीत अडकला. त्याने 11 धावांची खेळी केली. कॅमरुन ग्रीनने अश्विनच्या जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. यावेळी मिडवेकेटला फिल्डिंग करणाऱ्या भारतीय कर्णधाराने चपळाई दाखवून देत ग्रीनच्या खेळीला रेड लाईट दाखवत तंबूत धाडले. ग्रीनशिवाय अश्विनने स्टिव्ह स्मिथला अवघ्या एका धावेवर बाद केले. स्मिथने तब्बल 29 चेंडूचा सामना केला. ट्रेविस हेडलाही अश्विवनेच तंबूचा रस्ता दाखवला.  

सवंगडी मैदान सोडून जात असताना लाबुशेनला लाभली नशीबाची साथ (Video)

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पहिल्या डावात 74 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तो शतकी खेळी करेल असे संकेत दिसत असताना उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि त्याच्यातील ताळेमळ ढासळला आणि विराटने रन आउटतच्या रुपात विकेट गमावली होती. भारतीय संघाचा पहिला डाव 244 धावांवरच आटोपला. यात विराट कोहलीची 74 धावांची खेळी सर्वोच्च ठरली. गोलंदाजीतील हिट शोनंतर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी फ्लॉप ठरली आहे.  त्यामुळे पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी सामना पुन्हा भारताच्या बाजूनं वळला आहे.


​ ​

संबंधित बातम्या