AUS vs IND : मॅथ्यू वेड OUT होता पण कोहली चुकला, DRS वरुन फुटले वादाला तोंड

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 9 December 2020

रताचा माजी क्रिकेट आणि फिरकीपटू प्रज्ञात ओझाने डिआरएस हा चूक सुधारण्यासाठी आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. एवढेच नाही तर मॅथ्यू हेडने स्वत: तंबूत परतायला हवे होते, अशी भावनाही त्याने बोलून दाखवली आहे.  

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राउंडवर रंगलेल्या तिसऱ्या आणि टी-20 मालिकेतील अखेरच्या सामन्यात कोहलीनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात खराब झाली.

कर्णधार फिंच शून्यावर माघारी परतला. पण त्यानंतर मॅथ्यू वेडने संघाचा डाव सावरला. तो शतकी खेळी करेल असे वाटत असतान टी-नटराजन याने त्याला 80 धावांवर माघारी धाडले. मॅथ्यू हेडच्या विरोधात कर्णधार विराट कोहलीने घेतलेल्या DRS नंतर तो बाद असताना त्याला नॉट आउट देण्यात आले. ऑस्ट्रेलियाच्या डावातील 11 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर टी नटराजनने मॅथ्यू पायचित असल्याची अपील केली.

भारताने रिव्ह्यूवही घेतला. पण यासाठी अधिक वेळ घेतल्याने रिप्लेमध्ये मॅथ्यू हेड बाद असल्याचे दिसत असूनही त्याला नॉट आउट देण्यात आले. मिळालेल्या संधीचा फायदा घेत मॅथ्यून आपल्या खेळीत 51 धावांची भर घालत संघाला मोठी धावसंख्या उभी करुन देण्यात मोलाचा वाटा उचलला.

पंचाच्या निर्णयावर आता चांगलीच चर्चा रंगली आहे. भारताचा माजी क्रिकेट आणि फिरकीपटू प्रज्ञात ओझाने डिआरएस हा चूक सुधारण्यासाठी आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. एवढेच नाही तर मॅथ्यू हेडने स्वत: तंबूत परतायला हवे होते, अशी भावनाही त्याने बोलून दाखवली आहे.  
 


​ ​

संबंधित बातम्या