AUSvsIND: रोहित IN उमेश Out; टीम इंडियाच्या ताफ्यात 'कही खुशी कही गम'चा खेळ

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Thursday, 31 December 2020

ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या सुरुवातीला ईशांत शर्माच्या दुखापतीमुळे भारतीय गोलंदाजीतील ताकद कमी झाली. त्यानंतर प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे बाहेर पडला. आणि आता उमेश यादवलाही दुखापत झाली.

AUSvsIND : पहिल्या कसोटी सामन्यातील लाजीरवाण्या पराभवानानंतर दुसऱ्या कसोटीत अजिंक्य राहिलेल्या टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. सिडनी कसोटीपूर्वी उमेश यादव संघाबाहेर पडला आहे. एका बाजूला हिटमॅन रोहित शर्माच्या रुपात फलंदाजीतील ताकद वाढली असताना दुसऱ्या बाजूला गोलंदाजी ताफ्यातील टेन्शन वाढले आहे. भारतीय ताफ्या सध्याच्या घडीला 'कही खुशी कही गम' अशीच स्थिती निर्माण झाल्याचे दिसते. 33 वर्षीय जलगती गोलंदाज उमेश यादवला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात स्नांयू दुखापतीचा सामना करावा लागला. तिसऱ्या दिवशीच्या खेळात त्याच्यावर लंगडत लंगडत मैदान सोडण्याची वेळ आली. या दुखापतीमुळे उमेश यादव आता उर्वरित मालिकेला मुकणार आहे. 

भारतीय क्रिकेट मंडळाच्या बोर्ड (BCCI) वैद्यकीय टीमने दिलेल्या निवेदनानुसार, उमेश यादवला चौथे षटक फेकताना पिंडरीला दुखापत झाली होती. त्याच्या दुखापतीवर वैद्यकीय टीम लक्ष ठेवून आहे. त्याचे स्कॅन देखील करण्यात येणार आहे. दुखापत होण्यापूर्वी  उमेशने  दुसऱ्या षटकात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर जो बर्न्सला बाद केले होते. लयीत दिसत असताना त्याला दुखापत झाली. पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजने त्याचे षटक पूर्ण केले होते.  

ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या सुरुवातीला ईशांत शर्माच्या दुखापतीमुळे भारतीय गोलंदाजीतील ताकद कमी झाली. त्यानंतर प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे बाहेर पडला. आणि आता उमेश यादवलाही दुखापत झाली आहे. भारतीय संघ तिसऱ्या धक्क्यातून सावरुन कसा उभा राहणार आणि उर्वरित सामन्यात टीम इंडियाचा गेम प्लॅन काय असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मेलबर्न कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला 8 गडी राखून पराभूत करते मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.  

सलामीवीर रोहित शर्मा भारतीय संघात परतला आहे. संघातील इतर खेळाडू दोन दिवसांच्या ब्रेकवर असताना गुरुवारी त्याने मेलबर्नमध्ये नेटमध्ये सराव करण्याला प्राधान्य दिल्याचेही पाहायला मिळाले. भारतीय संघ सिडनीच्या मैदानात तिसरा कसोटी सामना खेळणार आहे. नववर्षांच्या पूर्वसंध्येचा संघाने सिडनीत दाखल व्हायला हवे होते. पण शहरातील कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे खेळाडू आणि स्टाफ सदस्यांनी अधिककाळ मेलबर्नमध्येच राहण्याचा निर्णय घेतलाय.


​ ​

संबंधित बातम्या