Aus vs Ind 4th Test : शुभमनची लक्षवेधी खेळी; लिटल मास्टर गावसकरांचा 50 वर्षांचा विक्रम टाकला मागे

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Tuesday, 19 January 2021

ब्रिस्बेन कसोटी सामन्यात 50 धावांची खेळी करताच त्याने लिटल मास्टर सुनिल गावसकर यांचा 50 वर्षांपूर्वीचा विक्रम मागे टाकला.

AusvsInd Shubman Gill Breaks Sunil Gavaskars Record भारतीय संघाचा युवा फलंदाज शुभमन गिलने आपल्या फलंदाजीने चांगलेच प्रभावित केले. ब्रिस्बेनच्या मैदानातील निर्णायक कसोटी सामन्यात त्याने कसोटी कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक झळकावले. अर्धशतकीचे तो शतकात रुपांतर करेल असे वाटत असताना, शतकी सामना खेळणाऱ्या नॅथन लायनने त्याला 91 धावांवर बाद केले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी पदार्पण करणाऱ्या शुभमनने बाद होण्यापूर्वी अनोखा विक्रम आपल्या नावे केला.  

ब्रिस्बेन कसोटी सामन्यात 50 धावांची खेळी करताच त्याने लिटल मास्टर सुनिल गावसकर यांचा 50 वर्षांपूर्वीचा विक्रम मागे टाकला. चौथ्या डावात सर्वात कमी वयात 50 + धावा करण्याचा विक्रम शुभमन गिलच्या नावे झाला आहे. गिलने 21 वर्ष आणि 33 दिवस या वयात हा पराक्रम करुन दाखवला. यापूर्वी हा विक्रम सुनिल गावसकर यांच्या नावे होता. गावसकर यांनी 21 वर्ष 243 दिवस वयात असा पराक्रम केला होता. 1970-71 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध   पोर्ट ऑफ स्पेनमध्ये झालेल्या पदार्पणाच्या सामन्यात गावसकर यांनी चौथ्या डावात 67 धावांची खेळी केली होती.

'गिल है की मानता नहीं'; सेहवागनं केली 'दिल जितनेवाली बात'!

गिलचा हा तिसरा कसोटी सामना आहे. पदार्पणाच्या सामन्यात गिलने अर्धशतक झळकावले होता. 91 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या ठरली. पाचव्या आणि अखेरच्या दिवशी भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर रोहित शर्मा अवघ्या 7 धावांवर बाद झाला. तो तंबूत परतल्यानंतर शुभमन गिलने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने पुजारासोबत 114 धावांची खेळी करत डाव सावरला. कसोटी कारकिर्दीतील पहिल्या शतकाच्या जवळ असताना नॅथन लायनने त्याला बाद केले.


​ ​

संबंधित बातम्या