Aus vs Ind : रोहित-शुभमन जोडी फुटण्याआधी झाला मोठा विक्रम!

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 10 January 2021

यापूर्वी 1968 मध्ये भारतीय   1968 मध्ये भारतीय संघातील सलामीवीरांनी ऑस्ट्रेलियात 50 + धावांची पार्टनरशिप केली होती.

पहिल्या डावात 70 धावांची दमदार भागीदारी करणाऱ्या युवा शुभमन गिल आणि हिटमॅन रोहित शर्माने दुसऱ्या डावात 71 धावांची भागीदारी केली. जोश हेजलवूडच्या गोलंदाजीवर 31 धावा करुन त्याला माघारी परतावे लागले. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाच्या मैदानात दोन्ही डावात 50 + भागीदारी करण्याचा अनोखा विक्रम या जोडीच्या नावे झाला होता. ग्रीन कॅमरुनच्या षटकात खणखणीत चौकार खेचताच सलग दुसऱ्या डावात भारतीय सलामीवीरांनी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली.

यापूर्वी 1968 मध्ये भारतीय   1968 मध्ये भारतीय संघातील सलामीवीरांनी ऑस्ट्रेलियात 50 + धावांची पार्टनरशिप केली होती. फारुख इंजिनीयर आणि सय्यद अबीद अली यांनी सिडनी कसोटीतील पहिल्या डावात 56 धावांची भागीदारी केली होती. यात फारुख इंजिनियर यांनी 44 चेंडूत 17 तर सय्यद अबीद अली यांनी 123 चेंडूत 78  धावा केल्या होत्या. ते हिट विकेट बाद झाले. दुसऱ्या डावात या जोडीने 83 धावा केल्या होत्या. यात दोघांनी अनुक्रमे 37 (72)  आणि 81 (165) अशी धावसंख्या केली होती. या कसोटी सामन्यात भारतीय संघाला 144 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. 

मागील 32 वर्षांत टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया 20 हून अधिक कसोटी सामने खेळले मात्र कोणत्याही सलामीवीरांनी दोन डावात 50 + धावांची भागीदारी केल्याचे पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियात कसोटी खेळताना डावाला सुरुवात करणे ही मोठी कसोटी असते हेच या आकडेवारीवरुन स्पष्ट होते. शुभमन गिल आणि रोहितच्या रुपात भारतीय संघाला कसोटीत एक दमदार जोडी मिळाली असे आपण म्हणू शकतो. पदार्पण कसोटी सामन्यात शुभमन गिलने अर्धशतकी खेळी केली. पहिल्या डावात त्याने 50 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावातही तो अर्धशतकी खेळी करेल, असे वाटत होते. मात्र, हेजलवूडच्या चेंडूने त्याच्या बॅटचे चुंबन घेतले आणि विकेटच्या मागे टीम पेनने कांगरुंची वेदना कमी करण्याचे काम केले.


​ ​

संबंधित बातम्या