Aus vs Ind : पंत ठरला धोनीपेक्षा फास्ट; अनोख्या विक्रमाला घातली गवसणी

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Tuesday, 19 January 2021

यापूर्वी हा विक्रम धोनीच्या नावे होता. धोनने फारुख इंजिनियर यांचा 36 डावात 1000 धावा करण्याचा विक्रम मागे टाकला होता.

Rishabh Pant Breaks MS Dhoni Record :  ब्रिस्बेन कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात खाते उघडताच पंतने धोनीचा विक्रम मागे टाकला. कसोटी क्रिकेटमध्ये ऋषभ पंतने 1000 धावांचा टप्पा गाठला आहे. यासाठी त्याने 27 वेळा बॅटिंग केली. भारतीय संघाकडून कसोटी सामन्यात सर्वाधिक जलद हजारीचा टप्पा पार करणण्याचा विक्रम आता पंतच्या नावे झालाय.

यापूर्वी हा विक्रम धोनीच्या नावे होता. धोनने फारुख इंजिनियर यांचा 36 डावात 1000 धावा करण्याचा विक्रम मागे टाकला होता. यष्टिमागची जबाबदारी सांभत धोनीने 36 डावात हा पल्ला गाठला होता. ब्रिस्बेन कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ऋषभ पंतने 23 धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने दोन धावांनी खाते उघडत धोनीला ओव्हरटेक केल. यष्टिमागे धोनीसारखी चपळता यायला त्याला आणखी खूप कष्ट करण्याची गरज आहे. तूर्तास जलद 1000 धावा करण्यात त्याने धोनीला मागे टाकले आहे. 

'गिल है की मानता नहीं'; सेहवागनं केली 'दिल जितनेवाली बात'!

भारतीय संघाने आघाडीच्या विकेट गमावल्यानंतर सामना पुन्हा ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकला आहे. सिडनी कसोटीत पंतकडून दमदार खेळ पाहायला मिळाला होता. त्याच्या आक्रमक खेळीनंतर अश्विन-हनुमा विहारीनं सिडनी कसोटी अनिर्णित राखली होती. निर्णायक सामन्यात विक्रमाला गवसणी घातल्यानंतर पंतवर आता आपल्यातील क्षमता दाखवून देत भारतीय संघाचा डाव सावरण्याची मोठी जबाबदारी आहे. त्याच्यासोबत पुजाराही मैदानात आहे. ही जोडी मैदानात जितका वेळ काढेल तेवढे भारतीय संघाचे टेन्शन निश्चितच कमी होईल. 


​ ​

संबंधित बातम्या