प्रकाशझोतात फिरकीचा सामना करणे अवघड : कुलदीप यादव 

संजय घारपुरे
Monday, 14 December 2020

ऑस्ट्रेलियात फिरकी गोलंदाजांना यश मिळत नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. येथील अनेक कसोटीत फिरकी गोलंदाजांनी निर्णायक कामगिरी केली आहे.

सिडनी: प्रकाशझोतात फिरकीचा सामना करणे अवघड असते, असे सांगत कुलदीप यादवने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटीसाठी आपली निवड करण्यासाठी जणू एक प्रकारे साकडे घातले. फिरकी गोलंदाजाने माऱ्यात वैविध्य आणले, तर प्रकाशझोतात चेंडूची सीम नेमकी कुठे आहे, हे समजणे फलंदाजास अवघड असते.

फिरकी गोलंदाजांना हा नक्कीच फायदा असतो, असे सांगताना भारताच्या परदेशातील पहिल्या गुलाबी चेंडूच्या कसोटीसाठी आपण कमालीचे उत्सुक असल्याचे सांगितले. ऑस्ट्रेलियात फिरकी गोलंदाजांना यश मिळत नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. येथील अनेक कसोटीत फिरकी गोलंदाजांनी निर्णायक कामगिरी केली आहे.

परिस्थितीशी जुळवून कसे घेतले जाते, हे जास्त महत्त्वाचे असते, असे कुलदीपने सांगितले. तो म्हणाला, गेल्या काही वर्षात ट्‌वेंटी 20 क्रिकेट वाढले आहे. कसोटीत संयम, मानसिक कणखरता महत्त्वाची असते. ट्‌वेंटी 20 खेळल्यावर कसोटी खेळताना प्रयोग लागोपाठ करण्याचा मोह होतो. कसोटीत विकेटसाठी प्रतीक्षाही करावी लागते, असेही तो म्हणाला.


​ ​

संबंधित बातम्या