ऑस्ट्रेलियन चाहता पुन्हा भान विसरला; सिराज-वॉशिंग्टनवर झाला अपशब्दांचा मारा

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Friday, 15 January 2021

चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मार्नस लाबुशेनच्या 108 धावा आणि त्याला मॅथ्यू वेडनं 45 धावा करुन दिलेली साथ याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाअखेर 5 बाद 274 धावांपर्यंत मजल मारली होती.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ब्रिस्बेन कसोटी सामन्यातही भारतीय जलदगती गोलंदाजावर प्रेक्षकांनी अपशब्दांचा मारा केला. सिडनी मॉर्निंग हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार मोहम्मद सिराजशिवाय वॉशिंग्टन सुंदरला उद्देशानेही काही प्रेक्षकांनी अपशब्द वापरले. वॉशिंग्टन सुंदर आपला पहिला कसोटी सामना खेळत आहे. तर सिराजचा हा तिसरा सामना आहे. सिडनीच्या मैदानात सिराज आणि बुमराहवर वर्णद्वेषी टिप्पणी करण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी स्टेडियमवरुन काही प्रेक्षकांना हकलूनही लावले होते. 

सिडनीमध्ये झालेल्या प्रकारानंतर सामना काही वेळ थांबवण्यात आला होता. भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेने मैदानातील पंचासह सामनाअधिकाऱ्यांकडे तक्रार देखील केली होती. ब्रिस्बेनच्या गाबा मैदानात सिराज आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यासंदर्भात खरंच असा प्रकार घडला असेल तर ते निंदणीय आहे. याचा परिणाम पुन्हा दोन्ही संघातील खेळाडूंवरही होऊ शकतो.   

स्लेजिंगचा खेळ! खुन्नस देणं नडलं; श्रीसंतची मुंबईकरानं केली धुलाई (VIDEO)

चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मार्नस लाबुशेनच्या 108 धावा आणि त्याला मॅथ्यू वेडनं 45 धावा करुन दिलेली साथ याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाअखेर 5 बाद 274 धावांपर्यंत मजल मारली होती. भारताकडून टी नटराजनने सर्वाधिक दोन तर  मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि वॉशिंगटन सुंदरने प्रत्येकी  एक-एक विकेट घेतली.  भारतीय खेळाडूंसोबत ब्रिस्बेनच्या मैदानात असभ्य वर्तन झाल्यासंदर्भात खेळाडू किंवा बीसीसीआयकडून अद्याप कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाही. 
 


​ ​

संबंधित बातम्या