Aus A vs Ind A: साहानं वाढवलं पंतचं टेन्शन!

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 8 December 2020

साहा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत पंतला संधी मिळेल, अशी चर्चा होती. पण ...

भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील तीन दिवसीय सराव सामन्यात वृद्धिमान साहाच्या भात्यातून फटकेबाजी पाहायला मिळाले. साहाने नाबाद अर्धशतकी करुन आगामी कसोटी मालिकेत प्लेइंग इलेव्हनमधील आपली दावेदारी भक्कम केली आहे. 17 डिसेंबरपासून भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.

साहा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत पंतला संधी मिळेल, अशी चर्चा होती. पण साहाने सराव सामन्यात दमदार खेळी करुन आपण फिट असल्याचे दाखवून दिले आहे.सराव सामन्यात भारतीय अ संघाचे 4 गडी तंबूत परतल्यानंतर साहा फलंदाजीला आला. यावेळी भारत अ च्या धावफलकावर 104 धावा होत्या. एका बाजूने विकेट पडत असताना साहाने दुसरी सावरुन धरली. त्याने 100 चेंडूचा सामना करताना  7 चौकाराच्या मदतीने 54 धावांची खेळी केली.

टी नटराजन एक निर्भिड गोलंदाज; वाचा कोण म्हणाले

भारत अ संघाने पहिल्या डावात 9 बाद 247 धावांवर डाव घोषित केला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया अ संघाने 9 बाद 306 धावांवर डाव घोषित केला.  भारत अने दुसरा डाव 9 बाद 189 धावांवर घोषित केला. तिसऱ्या आणि अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलिया अ संघाने दिवसाखेर 1 बाद 52 धावा केल्या. हा सामना अनिर्णित राहिला.

 ICC Test Rankings : विल्यमसनने रन मशीन विराटला टाकले मागे  

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना दिवस-रात्र खेळवण्यात येणार आहे. या सामन्यापूर्वी सराव सामन्यात पुजारा, अजिंक्य रहाणे आणि साहाने लयीत असल्याचे संकेत दिले. पहिल्या डावात रहाणेनं  117 तर दुसऱ्या डावात 28 धावांची खेळी केली. पहिल्या डावात अर्धशतकी खेळी करणारा पुजाराला दुसऱ्या डावात खातेही उघडता आले नाही. दुसऱ्या डावातील अर्धशतकी खेळीनं साहानं सामना अनिर्णित राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 


​ ​

संबंधित बातम्या