AUS vs IND पांड्याची फिनिशिंग खेळी पाहून ऑस्ट्रेलियन कोचला आठवला धोनी

सकाळ स्पोर्टस ऑनलाइन टीम
Monday, 7 December 2020

लँगर यांनी विराट कोहलीच्या खेळीचेही कौतुक केले. आपल्या 40 धावांच्या खेळीत विराटचे काही फटके डोळ्याचे पारणे फेडणारे असल्याचे ते म्हणाले. विराटसारखा खेळाडू सध्याच्या घडीला कोणीच नाही, या गोष्टीवरही त्यांनी भर दिला.

India Tour of Australia 2020 :ऑस्ट्रेलियन संघाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याची तुलना थेट माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीशी केलीय. हार्दिक पांड्याने दुसऱ्या टी-20 सामन्यात दमदार खेळी करत भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. पांड्याची मॅच फिनिशिंग इनिंग  ऑस्ट्रेलियन कोच लँगर यांना चांगलीच भावली आहे. त्यामुळेच त्यांनी पांड्याची तुलना थेट धोनीशी केलीय.  

दबावात असताना पांड्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध दमदार खेळ दाखवला. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या टी-20 मालिकेतील दुसरी मॅच क्रिकेट प्रेमींच्या दृष्टीने क्रिकेट चाहत्यांसाठी पैसा वसूल शो होता, असेही लँगर यांनी म्हटले आहे. हार्दिक पांड्या हा घातक फलंदाज आहे. त्याने अगदी धोनी स्टाईल फिनिशिंग खेळ दाखवला. भारतीय संघात टी-20 तील सर्वाधिक अनुभवी खेळाडू होते. त्यांच्या तुलनेत ऑस्ट्रेलियन संघ कमी पडला. संघाने बॅटिंग, फिल्डिंगमध्ये चांगला खेळ केला. सामना रंगतदार झाला, पण आम्हाला यश मिळवता आले नाही, असे लँगर यांनी म्हणाले.  

AUSvsIND 2 T20 : सामन्यातील काही खास क्षण एका नजरेत

लँगर यांनी विराट कोहलीच्या खेळीचेही कौतुक केले. आपल्या 40 धावांच्या खेळीत विराटचे काही फटके डोळ्याचे पारणे फेडणारे असल्याचे ते म्हणाले. विराटसारखा खेळाडू सध्याच्या घडीला कोणीच नाही, या गोष्टीवरही त्यांनी भर दिला.  दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेत मालिका खिशात टाकली. अखेरच्या षटकात हार्दिक पांड्याने धमाकेदार खेळी केली. पांड्याने अखेरच्या षटकातील चौथ्या चेंडूवर षटकार खेचत भारताला 6 विकेट आणि 2 चेंडू राखून विजय मिळवून दिला होता.  


​ ​

संबंधित बातम्या