AUS vs IND : रोहितचा 'बेफिक्रे' अंदाज अन् दुसऱ्या दिवशीच्या पाच मोठ्या गोष्टी

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Saturday, 16 January 2021

दुसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघाने दोन्ही सलामीवीरांच्या विकेट गमावून 62 धावा केल्या होत्या. सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियाच्या सामन्यावर पकड आहे. जाणून घेऊयात दुसऱ्या दिवशीच्या प्रमुख पाच घडामोडी

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील निर्णायक कसोटी सामना ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर सुरु आहे. पावसामुळे दुसऱ्या दिवसाचा काही खेळ वाया गेला. दुसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघाने दोन्ही सलामीवीरांच्या विकेट गमावून 62 धावा केल्या होत्या. सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियाच्या सामन्यावर पकड आहे. जाणून घेऊयात दुसऱ्या दिवशीच्या प्रमुख पाच घडामोडी

नटराजन-वॉशिंग्टननं सोडली विशेष छाप

भारतीय ताफ्यातील दुखापतीमुळे टी-नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या कसोटी पदार्पणाचा मार्ग मोकळा केला. वाईट गोष्टीनंतर चांगलं काही तरी घडतं अशीच कामगिरी या युवांनी करुन दाखवली. दुसऱ्या दिवशी धावांचा डोंगर रचण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या कांगारुंना थोडक्यात आटोपण्यात या दोघांनी मोलाचा वाटा उचलला या जोडीनं प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या. 72 वर्षानंतर कसोटीत पदार्पण करणाऱ्या दोघांनी एकाच सामन्यात 3-3 विकेट घेण्याचा योगायोग पाहायला मिळाला.  कोलकाता येथे 1949 मध्ये कोलकाता कसोटीत  मंटू बनर्जी आणि गुलाम अहमद यांनी याच थाटात पदार्पण केले होते. 

Aus vs Ind 4th Test Day 2: पावसाच्या बॅटिंगमुळं, भारताचा पहिला डाव 2 बाद 62 धावांवर थांबला

रोहितचा बेजबाबदारपणा!

रोहित शर्माने भारताच्या डावाला चांगली सुरुवात करुन दिली. शुभमन गिलने साथ सोडल्यानंतर त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. तो सेटही झाला. पण नॅथन लायनच्या चेंडूवर उत्तुंग फटका खेळण्याच्या नादात त्याने आपली विकेट फेकली. 44 धावा करुन त्याने मैदान सोडले. रोहितच्या शॉट सिलेक्शनवर गावसकरांनीही टीका केली आहे. जम बसवल्यानंतर कसोटीत रिस्की शॉट खेळून त्याने बेजबाबदारपणाचे दर्शन घडवले, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. 

पेन-ग्रीन जोडी लवकर फोडण्यात आलेलं अपयश

दुसऱ्या दिवसाच्या खेळात भारतीय गोलंदाजांना पहिली विकेट मिळवण्यासाठी खूप वेळ घेतला. पेन आणि ग्रीन यांनी शतकी भागीदारी करत संघाची धावसंख्या 350 + नेली. कॅमरुन ग्रीन (47) आणि टिम पेनने 50 धावा ठोकल्या. ही भागीदारी भारतासाठी डोकेदुखी ठरणारी अशीच होती. ही जोडी फोडण्यात लागलेला विलंब भारताला अडचणीत आणणारा ठरु शकतो. 
 

त्रिकूटांनी सोडली छाप 

पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या वॉशिंग्टन आणि नटराजनला शार्दुल ठाकूरनेही उत्तम साथ दिली. गाबाच्या खेळपट्टीवर शार्दुलनेही कमाल दाखवली. त्यानेही तीन विकेट घेतल्या. त्यानेच पेन-ग्रीन ही जोडी फोडली. पॅट कमिन्सला त्याने सेटही होऊ दिले नाही. यापूर्वी त्याने मार्नस हॅरिसची विकेट घेतली होती. 

ऑस्ट्रेलियाला 350+ च्या आत रोखण्यात अपयश

भारतीय गोलंदाजांनी पहिल्या पाच गड्यांना अवघ्या 213 धावांत तंबूत धाडले. मात्र तरही यजमानांना 350 पेक्षा कमी धावात गुंडाळण्यात आलेल्या अपयशामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ भारतीय संघापेक्षा एक पाउल पुढेच राहिला. 


​ ​

संबंधित बातम्या