Aus vs Ind 1st Test: पिंक बॉलवरील लाजीरवाण्या पराभवामागची कारणे 

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 19 December 2020

टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 191 धावांवर रोखत 53 धावांची आघाडी घेतली. पण दुसऱ्या डावातील निराशजनक कामगिरीने टीम इंडियाच्या कसोटी मालिकेची सुरुवात पराभवाने झाली.

Aus vs Ind 1st Pink Ball 1st Test n Adelaide : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅडलेडच्या मैदानात रंगलेल्या पिंक बॉलवरील पहिल्या कसोटी सामन्यात कांगारुंच्या गोलंदाजांसमोर भारतीय शेर ढेर झाल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघाचा दुसरा डाव अवघ्या 36 धावात आटोपला. पहिल्या डावात 244 धावा केल्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 191 धावांवर रोखत 53 धावांची आघाडी घेतली. पण दुसऱ्या डावातील निराशजनक कामगिरीने टीम इंडियाच्या कसोटी मालिकेची सुरुवात पराभवाने झाली. 4 सामन्यांच्या मालिकेत यजमानांनी 1-0 अशी आघाडी घेतली आहे. जाणून घेऊयात भारतीय संघाच्या लाजिरवाण्या पराभवामागची पाच कारणे 

1. पृथ्वी शॉचा फ्लॉप शो 
सराव सामन्यातील युवा खेळाडू शुभमन गिलच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करत भारतीय संघाने थोडाफार अनुभव गाठीशी असलेल्या पृथ्वी शॉला पसंती दिली. शॉ पहिल्या डावात खातेही उघडू शकला नाही. दुसऱ्या डावातही त्याला ही उणीव भरुन काढता आली नाही. दोन्ही डावात तो एकाच प्रकारच्या चेंडूवर बाद झाला. त्याचा फ्लॉप शो टीम इंडियासाठी डोकेदुखी वाढवणारा ठरला. 

AusvsIND 1st Test Day 3 :टीम इंडियाचे शेर तिसऱ्याच दिवशी ढेर! कांगारुंची मालिकेत 1-0 आघाडी

2. टॉप ऑर्डरचा फ्लॉपशो
पृथ्वी शॉ च्या फ्लॉप शोसोबत आघाडीच्या फलंदाजांनी नावाला साजेसा खेळ केला नाही. सलामीवीर मयांक अगरवालही 17 आणि 9 एवढ्याच धावा करु शकला. कसोटी स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजाराने पहिल्या डावात संयम दाखवत 43 धावा केल्या. पण दुसऱ्या डावात त्याला मैदानात तग धरता आला नाही.  

3. पहिल्या डावातील कोहलीच्या रन आउटची मोठी किंमत मोजावी लागली 

पहिल्या डावात विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी भारतीय डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. कर्णधार-उपकर्णाधाराची जोडी जमली असं दिसत असताना कोहली धावबाद झाला आणि ऑस्ट्रेलियाला मोठी विकेट मिळाली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 88 धावांची भागीदारी केली. भारतीय संघाच्या धावफलकावर 188 धावा असताना ही विकेट गमावली. भारताने अवघ्या 56 धावात 6 विकेट गमावल्या. 

4. मध्य फळीतील अपयश

पहिल्या डावात विराट कोहली बाद झाल्यानंतर मध्य फळीतील एकाही फंलदाजाने दबावात चांगली खेळी करण्याची क्षमता दाखवली नाही. रहाणे थोडाफार खेळला पण त्याला मोठी खेळी साकरण्यात अपयश आले. हनुमा विहारी आणा वृद्धिमान साहाही अपयशी ठरले. त्यामुळे भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या.  

5. टीम सिलेक्शनमध्ये गडबड 

अ‍ॅडलेड कसोटीसाठी भारतीय संघाने 24 तासांपूर्वीच प्लेइंग 11 ची घोषणा केली. फॉर्ममध्ये असलेल्या लोकेश राहुलला बाकावर बसवण्याच निर्णय कोहलीनं घेतला. त्याच्या जागी हनुमा विहारीला संधी दिली. ती चांगलीच अंगलट आली. 


​ ​

संबंधित बातम्या