Aus vs Ind 4th Test : अन् हिटमॅन रोहितवर आली गोलंदाजी करण्याची वेळ (VIDEO)

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Friday, 15 January 2021

भारतीय संघाला मालिका जिंकायची असेल तर रोहितच्या भात्यातून फटकेबाजी व्हायला पाहिजे.

Aus vs Ind 4th Test  : ब्रिस्बेनच्या मैदानात ऑस्ट्रेलियन संघाला सुरुवातीला झटके देणाऱ्या टीम इंडियाचे टेन्शन वाढणारी घटना पहिल्या दिवशी घडली. ऑस्ट्रेलियाच्या डावातील 36 व्या षटकात नवदीप सैनीला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. तो मैदानाबाहेर गेल्यानंतर त्या षटकातील उर्वरित एक चेंडू टाकून भारतीय संघाचा उप-कर्णधार रोहित शर्माने त्याचे षटक पूर्ण केले.  

रोहित शर्मा फलंदाजीसोबतच उजव्या हाताने गोलंदाजीही करतो. आयपीएलमध्ये हॅटट्रिकचा पराक्रम करणाऱ्या गोलंदाजात रोहित शर्माचा समावेश आहे. यापूर्वीही त्याला अनेकदा त्याने गोलंदाजी केली आहे. 33 कसोटी सामन्यात रोहितच्या नावे 2 विकेट्सची नोंद आहे. वनडेत 8 टी-20 मध्ये 1 आणि आयपीएलच्या मैदानात त्याने 15 विकेट घेतल्या आहेत. बोटाच्या दुखापतीमुळे तो सातत्यपूर्ण गोलंदाजी करत नाही. गोलंदाजी करायला आवडते मात्र बोटामुळे आता ते शक्य होत नाही, असे एका मुलाखतीमध्ये त्याने सांगितले होते. 

AusvsInd 4th Test : आणखी एक दुखापत! टीम इंडियाच्या गोलंदाजानं सोडलं मैदान

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्याला रोहित शर्मा मुकला होता. सिडनीच्या  मैदानात त्याने दमदार पदार्पण केले. पहिल्या डावात त्याने 26 धावांची खेळी केली होती. तर दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले होते. भारतीय फलंदाजीची मोठी जबाबदारी त्याच्यावर आहे. भारतीय संघाला मालिका जिंकायची असेल तर रोहितच्या भात्यातून फटकेबाजी व्हायला पाहिजे. तो कशी कामगिरी करणार हे पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक असतील. फलंदाजीपूर्वी एक चेंडू फेकत त्याने गोलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले. 


​ ​

संबंधित बातम्या