Aus vs Ind 4th Test Day 5 Live : सामना रंगतदार स्थितीत
रोहित शर्मा अवघ्या 7 धावा करुन तंबूत परतला आहे.
Australia vs India, 4th Test The Gabba, Brisbane : ब्रिस्बेनच्या मैदानात सुरु असलेल्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यातील फायनल दिवस निकाली लावण्याच्या इराद्याने रोहित शर्मा 4 आणि शुभमन गिल ० यांनी खेळाला सुरुवात केली. निर्णायक कसोटी सामन्यात अखेरच्या दिवशी टीम इंडियाला 324 धावा करायच्या आहेत. अखेरच्या दिवसाची ऑस्ट्रेलियाची सुरुवात दमदार केली. पॅट कमिन्सने टिम इंडियाची सलामी जोडी फोडण्यात यश मिळवले.
चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 328 धावांचे लक्ष्य दिले आहे. चौथ्या दिवसाअखेर टिम इंडियाने बिन बाद 4 धावा केल्या होत्या. पाचव्या दिवशी रोहित-शुभमनने संयमी खेळी करत खेळाला सुरुवात केली. पॅट कमिन्सने रोहितला माघारी धाडत टिम इंडियाला पहिला आणि मोठा धक्का दिला आहे. रोहित शर्मा 21 चेंडूत 7 धावा करुन माघारी फिरला आहे. त्यानंतर युवा शुभमन गिलनं पुजाराच्या साथीनं डाव सावरला आहे. गिलनं कसोटी कार्दितील दुसरे अर्धशतकही पूर्ण केले.
शुभमन गिल आणि पुजाराने दमदार भागिदारी करत भारतीय संघाच्या डावाला आकार दिला. या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी 114 धावांची खेळी केली. शतकाच्या उंरठ्यावर असलेल्या शुभमन गिलला शतकी कसोटी सामना खेळणाऱ्या लायनने बाद केले. शुभमन गिलने 91(146) धावा केल्या. कर्णधार अजिंक्य रहाणे 22 चेंडूत 24 धावा करुन माघारी फिरला.